उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/ सत्यवान रामटेके
कोंढाळा(देसाईगंज) :- देसाईगंजतालुक्याच्या कोंढाळा गावामध्ये काल,दिनांक-१२ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास महाविकास (इंडिया)आघाडीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अधिकृत उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांच्या निवडणुक प्रचारार्थ महाविकास(इंडिया)आघाडीच्या वतीने संपूर्ण गावामध्ये भव्य-दिव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार संपूर्ण महाविकास (इंडिया)आघाडीचे पदाधिकारी,मान्यवर,बालगोपाल, वयोवृध्द,महिला मंडळी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.
गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.सदर रॅलीच्या निमित्ताने “अबकी बार,बिजेपी सरकार हद्दपार” असे नारे लावून गावातील संपूर्ण परिसर गुंजित होते.नवीन देऊळ हनुमान मंदिर,जुना देऊळ हनुमान मंदिर,मुख्य चौक ते नवनगर टोली समाज वॉर्डातून सदर रॅली निघून आजमितीस एक अनोखा वा आगळा-वेगळा प्रकार प्रचारार्थ अनुभवयास मिळाला आहे.पूर्वी केवळ चारचाकी वाहन घेऊन वा एखादी प्रचार गाडी घेऊन समोरील चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजयी करा; असे म्हटले जात होते.मात्र हल्ली निवडणूक प्रचाराचा ट्रेण्ड बदललेला असल्याचे दिसून येत आहे.अशातच गावातील मुख्य चौकात ढोल-ताशांच्या गजरात महाविकास(इंडिया)आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले की,एखाद्याच्या नावात जरी नेते असेल परंतु नेता हा नेताच असतो; आजमितीस केवळ आपलीच पोळी शेकण्याचा अनेकांनी प्रयत्न केला असल्याने त्यांना त्यांची खरी जागा दाखविणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा पराभव हा निश्चित असल्याने अनेकजण कावरे-बावरे होऊन “मू मे राम व बगल मे छुरी”असे करतांना दिसून येत आहेत.त्यानंतर उपस्थित महाविकास(इंडिया)आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपापली मते व्यक्त करून भाजपाची पोलखोल केली.
प्रसंगी महाविकास(इंडिया)आघाडीचे परसराम टिकले,नितीनभाऊ राऊत,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट)देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितीज उके,शहराध्यक्ष अशोक माडावार,ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा नितीन राऊत,सामाजिक कार्यकर्ते रामदास मसराम,ज्येष्ठ पत्रकार राजरत्न मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ कुंभलवार,सदस्य संदीप वाघाडे,रोशन शेंडे,आक्रोश शेंडे, कुरुडचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुलाराम लाकडे,भास्कर वाटकर, वसाखे,मोहुर्ले,सीताराम धोटे,केशव शेंडे,गुरुदास बनसोड,गावातील तसेचमहाविकास(इंडिया)आघाडीचे पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

