Friday, September 4, 2026
Homeनवी दिल्लीउपाध्याय यांच्या मते; ७० हजार विरोधी पक्ष नेते व कार्यकर्त्यांनी भाजपाचे सदस्यत्व...

उपाध्याय यांच्या मते; ७० हजार विरोधी पक्ष नेते व कार्यकर्त्यांनी भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

दिल्ली :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत सुमारे ७० हजार विरोधी नेते व कार्यकर्त्यांनी भाजपाचे सदस्यत्व घेतले आहे. निवडणुकीपूर्वी सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे.विरोधी पक्षांच्या छावणीत धुमाकूळ घालत भाजपाने पाचशेपेक्षा अधिक बड्या नेत्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे.भाजपा प्रवेश समितीचे सदस्य ब्रज बहादूर उपाध्याय यांनी हा दावा केला आहे.ते म्हणाले, काँग्रेस,सपा आणि इतर पक्षांचे सुमारे ७० हजार नेते भाजपात सामील झाले आहेत.यात सुमारे ५३० नेते राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरचे

आहेत.उपाध्याय म्हणाले,भाजपात सामील झालेले बहुतेक लोक सपा आणि काँग्रेसचे आहेत.उर्वरित सामाजिक संस्था,सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी आणि विविध क्षेत्रातील लोक आहेत. भाजपाने दोन महिन्यांपूर्वी प्रवेश मोहीम सुरू केली होती,ज्यामध्ये विधानसभेपासून ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना भाजपासोबत आणण्याची रणनीती आखण्यात आली होती.पक्षाने उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांना प्रवेश समितीचे अध्यक्ष केले.त्याचवेळी राज्यसभा खासदार अमरपाल मौर्य आणि प्रदेश उपाध्यक्ष ब्रज बहादूर समितीचे सदस्य आहेत.उपाध्याय म्हणाले, पक्षाकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज आले आहेत.ज्यांची सतत तपासणी केली जात आहे. जिल्हा, प्रदेश आणि राज्य पातळीवर परवानगी मिळाल्यानंतर त्यांचा पक्षात समावेश करण्यात येत आहे.पक्षात सामील झालेल्यांमध्ये जिल्हा पंचायत सदस्य,क्षेत्र पंचायत सदस्य, नगर पंचायत नगरसेवक, नगर पंचायत अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने महानगरपालिकेचे नगरसेवक,जिल्हा व प्रदेश पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

८० माजी आमदार,खासदार,मंत्र्यांचा समावेश

उपाध्याय म्हणाले,आतापर्यंत ८० पेक्षा अधिक माजी आमदार,खासदार आणि माजी मंत्र्यांनी भाजपाचे सदस्यत्व घेतले आहे.याशिवाय बसपाचे विद्यमान खासदार रितेश पांडे आणि संगीता आझाद यांनीही भाजपात प्रवेश केला आहे.काँग्रेसचे माजी खासदार राजेश मिश्रा,माजी आमदार अजय कपूर,माजी सपा खासदार देवेंद्र यादव,बसपचे माजी खासदार वीर सिंह,बदायूंमधील सपा आमदार आशुतोष मौर्य यांच्या पत्नी सुषमा मौर्य,माजी डीजीपी विजय कुमार हेही भाजपाचे सदस्य झाले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!