Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजघरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास देसाईगंज पोलीस प्रशासनाने केली अटक….-सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप...

घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास देसाईगंज पोलीस प्रशासनाने केली अटक….-सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर आणि पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज (गडचिरोली) :- देसाईगंज पोलीस प्रशासनाने गस्ती दरम्यान देसाईगंज ब्रम्हपुरी रोड वरील विर्षी वार्ड जवळ एका संशयित इसमास विचारपूस करून ताब्यात घेतले;विचारपूस करित असताना आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावरून संशय अधिक बळकट झाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले.अधिक विचारपूस केली असता,सदर इसम हा अनेक घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपी असल्याचे कळले.सदर आरोपीचे नाव व्यंकटी रामा घोडमारे वय ३८ वर्ष राहणार विर्षी वार्ड देसाईगंज असे आरोपीचे नाव आहे.

सदर आरोपी हा नुकताच दोन महिन्याआधी जळगाव जेल मधून सुटला असल्याची माहिती आरोपीने दिली.  सदर आरोपी वर जळगाव,भुसावळ,चंद्रपूर, भंडारा,नाशिक,औरंगाबाद,नागपूर जिल्ह्यात घरफोडी चे गुन्हे दाखल आहेत.तसेच नजीकच्या भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात घरफोडी चा गुन्हा दाखल आहे.सदर आरोपीला देसाईगंज पोलीस प्रशासनाने ताब्यात घेऊन देसाईगंज येथील अनेक घरफोडी संदर्भात विचारपूस करण्याकरिता देसाईगंज पोलीस स्टेशनला आणण्यात आले आहे.सदर तपास देसाईगंज पोलीस निरीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर हे करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!