Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तझुकेगा नही साला' २ मध्ये झळकणार संजय दत्त…-येत्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला...

झुकेगा नही साला’ २ मध्ये झळकणार संजय दत्त…-येत्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार पुष्पा २ चित्रपट….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- सध्याच्या घडीला हिंदी चित्रपट सृष्टी पेक्षा साऊथच्या चित्रपटांना अनेकांकडून पसंती दर्शविली जात आहे.साऊथ चे चित्रपट अनेकांना भुरळ घालीत असल्याचे हल्ली दिसून येत आहे.अशातच साऊथच्या पुष्पा चित्रपटाने चाहत्यांवर वेगळ्या प्रकारचे गारुड केले होते.त्याच्या पहिल्या भागाला  प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या टू पार्टची चर्चा सुरु होती. अखेर येत्या वर्षी डिसेंबरमध्ये हा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच एक नवी बातमी समोर आली आहे.

‘पुष्पा टू द रुल’ नावाच्या चित्रपटामध्ये अल्लु अर्जुन हा प्रमुख भूमिकेत असून त्यातील व्हिलनच्या भूमिकेत बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव घेतले जात आहे.पुष्पाच्याबाबत बोलायचे झाल्यास या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई करुन एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता.

बॉलीवूडचा खलनायक हा आता पुष्पा टू (२)मध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.आजतक वृताने दिलेल्या माहितीनुसार, पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी संजय दत्तशी संपर्क साधल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी समोर आली होती की,दिग्दर्शकाने व्हिलनच्या भूमिकेसाठी बॉलीवूडमधील एका बडया कलाकाराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तचा पुष्पा २ मध्ये निगेटिव्ह रोल असणार आहे.असेही म्हटले जात आहे की त्याची ती भूमिका चित्रपटातील सर्वात महत्वाची भूमिका ठरणार आहे.कथानकामध्ये आणखी एका प्लॉटचा समावेश करण्यात आला असून त्यात आता संजय पूर्ण चित्रपटात दिसणार नसून त्याचा एक मोठा कॅमिओ असणार आहे.

यापूर्वी देखील पुष्पाच्या बाबत वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यात प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी हा पुष्पा २ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.त्यानंतर न्युज १८ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनोजबे या सगळ्या अफवा असल्याचे बोलले होते.यशच्या केजीएफ २ मध्ये दमदार परफॉर्मन्स दिलेल्या संजय दत्तच्या नावाची आता जोरदार चर्चा होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

हिंदू खाटीक समाजातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज व अनुदान योजनांचा लाभ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या उपकंपनी असलेल्या हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळ मार्फत हिंदू खाटीक समाजातील पात्र लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी विविध...

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!