Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूररस्त्यावर बिबट बसलेला दिसताच 'त्याची' उडाली भंबेरी….

रस्त्यावर बिबट बसलेला दिसताच ‘त्याची’ उडाली भंबेरी….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- सिंदेवाही तालुक्यातील खांडला येथील युवक मोटारसायकलने पुरकेपारवरून आपल्या गावाकडे परत जात असताना रस्त्यावर बिबट बसलेला दिसताच त्यांची भंबेरी उडाली. शेवटी गावातील लोकांना फोन करून बोलाविल्यानंतर त्यांच्यासह तो गावात परतला.हा प्रकार दोन दिवसांपूर्वी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास घडला.

खांडला येथील अजय मेश्राम सायंकाळी ६:३० ते ७ च्या दरम्यान दुचाकीने पुरकेपारवरून स्वगावी जात असताना रस्त्यावर बिबट बसला असल्याचे दिसले. काही वेळ दोघेही एकमेकांकडे बघत राहिले.शेवटी जिवाच्या भीतीने अजयने दुचाकी परत फिरवली व दूरवर जाऊन वडिलांना फोन करून माहिती दिली. शेवटी त्याचे वडील व गावातील नागरिक त्याला घ्यायला आले आणि त्यांच्यासह तो सुखरूप खांडला येथे पोहोचला.रत्नापूर खांडला रस्त्यालगत बुधवारी बिबट्याने गायीची शिकार केली होती.त्यामुळे बिबट या परिसरातच आहे.अगदी रस्त्यालगत शिकार केल्याने खांडला सरांडी येथील विद्यार्थी शिक्षणासाठी नवरगावला ये- जा करतात.त्यातील काही विद्यार्थ्यांनाही या बिबट्याने दर्शन दिल्याने या रस्त्याने ये-जा करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नक्षल चळवळीतील शेवटचा सक्रिय सर्वोच्च नेता मिसिर बेसरा याची झारखंडच्या सारंडा जंगलात अन्नावाचून कोंडी झाल्याने मोजक्या नक्षलवाद्यांसह जंगलात भटकत असतांनाच त्याच्या अंगरक्षकासह...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!