Thursday, April 30, 2026
Homeचंद्रपूरमित्रांसोबत दारूची पार्टी; वाद गेला विकोपाला अन् धारदार शस्त्राने युवकाची हत्या….

मित्रांसोबत दारूची पार्टी; वाद गेला विकोपाला अन् धारदार शस्त्राने युवकाची हत्या….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- मागील आठवडाभरापासून चंद्रपूर जिल्ह्यात हत्येचे सत्र सुरू आहे.ब्रह्मपुरी,गोंडपीपरी, बल्लारपूर नंतर आता चंद्रपूर शहरात युवकाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अष्टभुजा वॉर्ड निवासी सूरजसिंह कुंवर वय २५ वर्षे, असे मृतकाचे नाव आहे.या प्रकरणी रामनगर पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून यामध्ये अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सूरजसिंह कुंवर व आरोपी हे एकमेकांचे मित्र होते.शुक्रवारी रात्री मृतक सूरजसिंह कुंवर हा मित्रांसोबत दारूची पार्टी करीत होता.दरम्यान आपसात त्यांच्यामध्ये भांडण झाले. भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले.त्यांनतर आरोपीनी धारधार शस्त्राने सूरजची हत्या केली.हत्या केल्यावर आरोपींनी सूरजचा मृतदेह अष्टभुजा येथील मनपाच्या डम्पिंग यार्ड येथे कचऱ्याच्या खड्यात टाकला,जेणेकरून कुणाला मृतदेह मिळणार नाही. मात्र शनिवारी घटनास्थळावर परिसरातील नागरिकांना रक्ताचा सडा आढळून आल्याने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.रामनगर पोलिस तत्काळ अष्टभुजा येथे दाखल झाले.त्यांनी तपास सुरू केला असता सूरजसिंह हा सकाळपासून दिसला नसल्याचे आढळून आले,सखोल व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मृतदेह डम्पिंग यार्ड मधून शोधून काढला.रात्री सूरज कुणासोबत होता.याबाबत माहिती काढली असता; या प्रकरणात अविनाश सोनटक्के,आदर्श हलधर,धम्मदीप उर्फ राजा इंगळे व अभिषेक मेहता यांना अटक करण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!