Monday, August 10, 2026
Homeकुरुडअखेर कुरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच पूर्वपदावर झाले विराजमान…-  गैर अपिलार्थिंना जोरदार झटका…केलेले आरोप...

अखेर कुरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच पूर्वपदावर झाले विराजमान…-  गैर अपिलार्थिंना जोरदार झटका…केलेले आरोप बिनबुडाचे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

कुरुड(गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कुरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष क्षितिज उके यांनी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आल्यानंतर पाच वर्षात मिळणारे संपूर्ण मानधन शासनास परत दिले असल्याने गावातच नव्हे तर संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

जिल्ह्यात २०२१ मध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या; कुरुड ग्रामपंचायतीमध्ये क्षितीज उके यांनी पहिल्यांदाच आपले पॅनल तयार करून निवडणूक लढविली होती.निवडणुकांचा निकाल जाहीर होताच उके यांच्या पॅनलने बहुमत सिद्ध करून ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काबीज केली. कुरुड ग्रामपंचायतीच्या तब्बल२५ वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच परिवर्तन घडून आले. देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तथा कुरुड ग्रामपंचायतीचे कार्यरत असणारे क्षितीज उके यांनी जनतेला दिलेली आश्वासने,जनसामान्यांचे प्रश्न,मन- मिळावू स्वभाव,सर्वांना समजून घेणारे,विकासात्मक भूमिका घेणारे असे व्यक्तिमत्त्व असल्याने जनतेचा कौल मोठ्या प्रमाणावर गावातच नव्हे तर तालुक्यातही दिसून येतो.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांना खोटे बोलणे वा ऐकून घेणे अजिबात आवडत नाही.निवडून आल्यानंतर क्षितीज उके यांनी ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या पहिल्याच मासिक सभेत सर्वांसमोर पत्राद्वारे लिहून दिले की मला पाच वर्षात शासनाकडून ग्रामपंचायत अंतर्गत मिळणारे  भत्ते व मिळणारे मानधन,सर्व शासनास देत आहे. याबाबतीत गावातील नागरिकांना वा इतरत्र कुठेही त्यांनी कळू दिले नाही व तशी माहितीही होऊ दिली नाही.मात्र गुपितरीत्या माहिती घेतली असता सदर बाब निदर्शनास आली असल्याने क्षितीज उके यांचा नवा आदर्श दिसून येतो आहे.अशातच काहीजण जळावू प्रवृत्ती तसेच मनात द्वेष भावना ठेऊन; नाहक त्रास देऊन; पदावरून हटविण्याचा जणूकाही त्यांनी ठेकाच घेतला की काय? असे निदर्शनास येऊ लागले आहे.महत्वाचे म्हणजे दुसऱ्यांसाठी खड्डा खणला जाणारे स्वतःच एक ना एक दिवस खड्ड्यात जाणार असल्याचे बोलले जात आहे.

कुरुड ग्रामपंचायतीचे उपसरपंच; क्षितिज उके 👇कित्तेक वर्षांपासून ग्रामपंचायत कुरुड येथे अनेकांनी सत्ता गाजवली; मात्र मी वा इतरांनी कुणा विषयी मनात द्वेष भावना कधीही ठेवली नाही.पूर्वजांनी केलेले अतिक्रमण हे त्यांच्याच नावे आहे.माझ्या नावे कुठलाही अतिक्रमण नसल्याने केलेली तक्रार ही बिनबुडाची आहे.गैर अपिलार्थी हे स्वतःला ग्रेट समजून घेणे हे चुकीचे आहे.कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!