Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीमराठी शाळेतील शिक्षकांचीच मुले खाजगी शाळेत…-पिढ्या घडविणाऱ्या शाळा वाचणार तरी कश्या?

मराठी शाळेतील शिक्षकांचीच मुले खाजगी शाळेत…-पिढ्या घडविणाऱ्या शाळा वाचणार तरी कश्या?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

गडचिरोली :- गोर-गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांची मुले-मुली मराठी शाळेत शिक्षण घेत असून ज्या शाळेत शिक्षण देणारे शिक्षकच आपल्या पाल्यांना स्वतः शिक्षक असलेल्या शाळेत शिक्षणासाठी पाठवीत नसतील तर ही किती शोकांतिका आहे? मराठी शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे.एकीकडे मराठी शाळा वाचविण्याचा नारा दिला जातोय तर दुसरीकडे मराठी शाळेवरील शिक्षकच आपल्या पाल्यांना खासगी इंग्रजी शाळेत पाठवून शिकवत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे शिक्षकच मुलाला मराठी शाळेत शिक्षण घेण्यासाठी पाठवीत नसल्याने इतर पालकांची देखील द्विधा मनस्थिती होत आहे.

पूर्वी शिक्षक वर्ग गावात मुख्यालयी वास्तव्यास राहून अनेक विद्यार्थी वर्गांना घडविण्याचे काम करीत होते.त्यानुसार मराठी शाळेत शिक्षण घेणारे मोठ-मोठे अधिकारी,कर्मचारी यांनी मान उंचावली आहे.मात्र सध्या स्थितीत अनेक शिक्षक मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याने विद्यार्थी वां अधिकारी,कर्मचारी बनने कठीण झाले आहे.

मराठी शाळा वाचविण्यासाठी पालकांनी मुलांना मराठी शाळेत पाठवा; असे सांगावे लागते.मराठी शाळांची पटसंख्या वाढेल तर शिक्षकांची नोकरी वाचेल; अशी परिस्थिती असतांना मात्र येथे असे सांगणाऱ्या शिक्षकांचीच मुले खासगी शाळेत शिकत आहेत.तर मग शिक्षक इतर पालकांना मुलांना मराठी शाळेत दाखल करण्यासाठी कसे बोलणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एक मराठी शाळा का बंद पडते, याचाही विचार करावा लागणार आहे. गावातील याच मराठी शाळांनी येथील पिढ्या घडवल्या.आज याच सरकारी शाळांवर गंडांतर आले आहे.शिक्षण विभागासह कोणालाही त्याचे सोयरसुतक असल्याचे दिसत नाही.

गावोगावच्या मराठी शाळा बंद पडतात,याचे खापर केवळ इंग्रजी माध्यमाकडे मुलांना वळवणाऱ्या पालकांवर फोडता येणार नाही; मुळात या पालकांना इंग्रजी माध्यमाकडे का वळवावे वाटते; ती कारणे आधी तपासावी लागतील.मराठी शाळेतील शिक्षकच आपल्या पाल्यांना स्वतः शिकवत असलेल्या शाळेत दाखल करत नसतील तर इतर पालकांनी कोणत्या विश्वासाने आपल्या पाल्यांना मराठी शाळेत शिकवावे; असा प्रश्न पडणे स्वभाविक आहे.त्यासाठी सर्व प्रथम मराठी शाळांवरील शिक्षकांनी आपण ज्या मराठी शाळांवर नोकरी करून आपला प्रपंच चालवत आहो; याचे भान ठेवून मराठी शाळेत आपल्या पाल्यांना दाखल करून घेणे गरजेचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!