Friday, September 25, 2026
Homeदेसाईगंजरेती तस्करांचा अड्डा,वैनगंगा नदी घाटात अवैध उत्खननाचा भला मोठा खड्डा…-कुरुड-बोडेगांव वैनगंगा नदी...

रेती तस्करांचा अड्डा,वैनगंगा नदी घाटात अवैध उत्खननाचा भला मोठा खड्डा…-कुरुड-बोडेगांव वैनगंगा नदी घाटावरील प्रकार, महसूल विभाग गाढ झोपेत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज (गडचिरोली) :- देसाईगंज तालुक्याच्या कुरुड येथुन दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या वैनगंगा नदी घाटातील बोडेगांव वैनगंगा नदी घाटातून रेती तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढले जात आहे.अशातच देसाईगंज महसूल विभाग गाढ झोपेत असल्याने शासनास लाखो रुपयांचा चुना लागून “रेती तस्करांचा अड्डा तर वैनगंगा नदी घाटात बनला अवैध उत्खननाच्या रेती चोरीचा भला मोठा खड्डा”असे दिसून येत आहे.

रेती तस्करांची दिवसेंदिवस ताकद वाढतच चालली जात असल्याने रात्रीच्या अंधाराच्या फायद्या बरोबरच दिवसाढवळ्या व सकाळच्या सुमारासही खुलेआम रेती तस्करी सुरू आहे.गावापासून पश्चिमेस दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नहराच्या मार्गाने तसेच गावामधून जाणाऱ्या मार्गावरून ट्रॅक्टर वा इतर साधनांद्वारे नदी रेती घाटातून रेती तस्करी केली जात आहे.रेती तस्करांमुळे “गावकरी झाले त्रस्त अन् रेती तस्कर मस्त”असे हल्ली दिसून येत आहे.

काही रेती तस्करांचा म्होरक्या कोण कुठुन येत आहे? याची माहिती पुरविण्याचे काम सुरू असल्याची जनसामान्यांमध्ये खमंग चर्चा सुरू आहे. काही रेती तस्करांनी नवनवीन ट्रॅक्टर सुद्धा खरेदी केलेली आहेत.रेती तस्करांना एवढी हिम्मत वा ताकद वाढण्यामागचे मुख्य कारण म्हणजे पाणी खालच्या स्तरापासून तर वरच्या स्तरापर्यंत कुठे तरी मुरत असावे; अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. कित्येकदा रेती तस्करी बाबत बातम्या प्रसारित करण्यात येतात.त्यावेळेस रेती घाटावरील मुख्य रस्त्यावर खड्डे मारले जातात.मात्र रेती तस्कर दोन दिवसांतच खड्डे बुजवून ‘जैसे थे’अशी अवस्था करीत आहेत.यासाठी महसूल विभाग वा शासन स्तरावरून ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!