Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजकुरुड येथे मोफत रोगनिदान आरोग्य शिबिर संपन्न-शिबिराचा १०१२ रुग्णांनी घेतला लाभ…..

कुरुड येथे मोफत रोगनिदान आरोग्य शिबिर संपन्न-शिबिराचा १०१२ रुग्णांनी घेतला लाभ…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- तालुक्याच्या कुरुड गावामध्ये श्युअरटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ली.कार्डिओलॉजी, पॉलीट्रॉमा,सुपर स्पेशालिस्ट युनिट जामठा आणि मनोज ढोरे प्रदेश सरचिटणीस ओबीसी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश व ग्रामपंचायत कुरुड यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिर काल,दिनांक – १३ जानेवारी २०२४ शनिवारला कुरुड येथील श्री.संत गजानन महाराज देवस्थान पाटीलपुरा याठिकाणी संपन्न झाला.

श्युअरटेक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ली.युनिट जामठा (नागपूर) यांच्या वतीने शिबिर स्थळी १०१२ रुग्णांनी नोंदणी करून आरोग्याची तपासणी केली. रुग्णांमधून गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना नागपूर येथील श्युअरटेक हॉस्पिटल येथे मोफत उपचार मिळणार आहे.याप्रसंगी डॉ.अनुप पुसाटे,डॉ.उर्मिला ढानके, डॉ.तनय नाहाटकर,डॉ.वीरेंद्रसिंह बावा,डॉ.निलेश वाडीभस्मे,डॉ.वैष्णवी ओझा, डॉ.कांचन चांडक,डॉ.मोनीषा पडवेकर,श्री प्रसाद पांडे,श्री मोहन लोहबरे,आरोग्य सेविका सेवक पायल मोहाडीकर,गोपिका कोबे,मिलिंद मेश्राम,रवी डोकंरमारे,आणि शूअरटेक परिवार हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी रुंद यांनी योग्यप्रकारे मार्गदर्शन करत औषधी, इसीजी,ब्लड तपासणी,शुगर तपासणी,हड्डी तपासणी,हृदयरोग तपासणी,मधुमेह तपासणी इतर सर्व आजारांची चिकित्सा करून रुग्णांना मोफत सेवा दिली. 

सदर शिबिराच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सुरेंद्रभाऊ चंदेल(ऊबाठा) शिवसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी प्रदेशाध्यक्ष आदिवासी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी गावच्या प्रथम नागरिक प्रशाला अविनाश गेडाम,कोंढाळा गावचे प्रथम नागरिक सरपंचा अपर्णा राऊत,कुरुड गावचे उपसरपंच क्षितीज भाऊ उके,ज्येष्ठ नेते हसनअली गिलानी,मनोहर पाटील पोरेटी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली,वामनराव सावसाकडे किसान काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गडचिरोली,दिगांबर मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य,अविनाश गेडाम ग्रामपंचायत सदस्य कुरुड,महादेव ढोरे तंटामुक्त समिती अध्यक्ष कुरुड,नंदू भाऊ चावला माजी तालुकाप्रमुख देसाईगंज,विलास गोटेफोडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस कमिटी गडचिरोली,विजय भाऊ कुंभलवार,दूशांत वाटघुरे सेवा दल तालुका अध्यक्ष,पुष्पाताई कोहपरे तालुकाध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी देसाईगंज,आरती लाहेरी,रजनीताई आत्राम आणि मंचकावरील पाहुणे मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्यायशस्वीतेसाठी आयोजक मनोज ढोरे प्रदेश सरचिटणीस ओबीसी काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश,अविनाश भाऊ गेडाम,संतोष पारवेकर,विजय कुंभलवार,राम बुराडे,खुशाल राऊत,बंडू देशमुख, सुखदेव ठाकरे,अशोक कुथे,सुरज चौधरी,संपत बेदरे, महालक्ष्मी कॅटर्स चे सर्व कर्मचारी व संपूर्ण मित्रपरिवार यांनी विशेष सहकार्य केले

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!