उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
कुरूड (देसाईगंज) :- संविधान दिनाचे औचित्य साधून आज दिनांक-२६ नोव्हेंबर २०२३ रोजी कुरूड येथे संविधान दिन सकाळी १०.००वाजेच्या सुमारास गावातील बौद्ध उपासक,उपासीका यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संविधान दिन साजरा करतेवेळी सर्वप्रथम बौद्ध समाजाचे अध्यक्ष क्षितिज उके व गावातील मान्यवरांच्या हस्ते बी.आर.आंबेडकर तसेच शांतीदूत तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर संविधान दिनाचे महत्व पटवून देण्यात आले.संविधान दिनाचे महत्त्व पटवून देतांना कुरूड बौद्ध समाजाचे अध्यक्ष क्षितिज उके म्हणाले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचेच नव्हते तर सर्वांचेच हित जोपासणारे होते.मात्र आजही काहीजण मनात द्वेष भावना बाळगून त्यांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करीत आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ दलितांचाच विचार केला नाही तर समाजातील शोषित,वंचित व इतर जातींचा विचार करून त्यांना कसे वरचढ करता येणार याकडे त्यांनी संपूर्ण आयुष्य पणाला लावून संविधान लीहिण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.तरीही सुध्दा आजही काहीजण त्यांना ते केवळ दलितांचेच समजणे ही चुकीची मन धारणा असल्याचे उके यांनी म्हटले आहे.
संविधान बदलणे ही कुणाच्या बापांची जहागिरी नाही.यासाठी तसा जन्म घेऊन कर्म करावे लागतात.असे अनेक मान्यवरांनी संविधान दिनाचे औचित्य साधून वक्तव्य केले आहे.सदर कार्यक्रमाच्या वेळी कुरूड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष क्षितिज उके,बौद्ध महिला मंडळ उपाध्यक्ष वंदना घोडेस्वार,उपासक पितांबर हुमणे,अतुल घोडेस्वार,उपासिका सारिका उके, करिष्मा हुमणे,गावातील बहुसंख्य नागरिक तसेच बौद्ध उपासक,उपासिका उपस्थित होते.

