उद्रेक न्युज वृत्त :- युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र,महाराष्ट्र व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संसद- २०२३ ची ४ नोव्हेंबर २०२३ रोजी निवडणूक झाली असून दिनांक ७ नोव्हेंबर ला निवडणुकीचा निकाल लागला.त्यात महाराष्ट्रातील तमाम युवांनी गडचिरोली जिल्ह्यातील सुरज चौधरी यांना पंतप्रधान आणि प्रियंका ठाकरे यांना महिला व बालकल्याण पदाकरीता प्रचंड मतांनी विजयी केले आहे.दोन्ही उमेदवार गडचिरोली जिल्ह्यातील नेतृत्व करणारे असुन गडचिरोली जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहेत.सुरज चौधरी यांनी निपुण भारत या भारत सरकार च्या शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात प्रथम संस्थेच्या वतीने जिल्हा समन्वयक म्हणून काम केले असून प्रियंका ठाकरे ह्या उत्कृष्ट निवेदक आणि रिपोर्टर म्हणून कार्यरत आहेत.या सोबतच दोन्ही तरूण जिल्ह्याच्या सामाजिक शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने समाजप्रबोधनाचे काम व समाजात शैक्षणिक जनजागृती करीत आहेत.सामाजिक कार्य करत अगदी स्थानिक पातळीपासून राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत ह्यांनी नेतृत्व केले असून अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहे.निवडणूकीत सुद्धा दोघांनी बाजी मारली असून १९ आणि २० नोव्हेंबर २०२३ ला ते गडचिरोली सोबतच महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी पुंडे,मार्गदर्शक मीत्र नितीन गायकवाड, ओमकार पाटिल गणेश माळी,सौरभ वाघमारे,तुषार माने,सुनील वाघमारे,स्वप्निल दळवी,तृप्ती मोकळं, कोमल दुर्गुडे,सलमान खान,प्रियंका गायकवाड,तेजस दोनाडकर प्रशांत खांडवे, तुकाराम माळी, तसेच महाराष्ट्रातील सर्व मित्र परिवार व आपल्या जिल्ह्यातील संपूर्ण युवावर्ग आणि आपल्या गावाला दिले आहे.दोघांच्या ही विजयाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे…

