Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीभन्ते भगीरथ १३  लाख रुपयांचा हिशोब देणार कधि?-हिशोब देणार की केवळ 'आम...

भन्ते भगीरथ १३  लाख रुपयांचा हिशोब देणार कधि?-हिशोब देणार की केवळ ‘आम भरो पोट भरो’ करणार?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके 

 गडचिरोली :- मागील वर्षात बुद्ध विहार कोठरी परिसरातील समापण सोहळ्याचा कार्यक्रमात कार्यक्रमाचे आयोजक प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी १३ लाख रुपये धम्मदान म्हणुन वर्गणी गोळा करून दिली होती.सदर रकमेतुन भगीरथने बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी साधी एकही विट लावली नाही.अशातच मिळालेल्या संपूर्ण रकमेचा हिसोब आयोजकांनी एका बैठकीत विचारले असता; ते टोलवा टोलविचे उत्तर देत असल्याचा आरोप प्रा.मूनिश्र्वर बोरकर यांनी केला आहे.

बोरकर यांनी म्हटले की,मागील वर्षात समापण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टीवार यांचेकडून स्वतः बोरकर यांनी ११ लाख रुपये बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी वर्गणी गोळा करून दिली.तसेच मानकर ताईकडून १ लाख व स्वतः मुनिश्वर बोरकर यांनी स्वतः १ लाख रुपये देणगी दिली.एकंदरीत १3 लाख रुपये वर्गणी म्हणुन सहकार्य केले होते.परंतु भगीरथ भन्ते यांनी सदर रक्कमेचा कोणताच विनियोग न करता उलट समाजाच्या लोकांनी दिलेल्या वर्गणीतून त्यांनी आपल्या मुलांचा वाढदिवश साजरा केला व वाढदिवसाच्या कार्यक्रमात ५ लाख रुपये खर्च केले.जो मुलगा वर्धा येथे आपल्या आईसोबत राहतो.त्याच्या वाढदिवशाच्या कार्यक्रमात नाटकाचे आयोजन केले होते.तसेच गावजेवण,भव्य रोषणाई व इतर खर्च मिळून एकंदरीत ५ लाख रुपये बौद्ध बांधवाच्या दिलेल्या वर्गणीतुन खर्च केले.गोळा झालेल्या धम्मदानातुन अश्या प्रकारे पैशाची उधळपट्टी करणे व इतरांवर आरोप करणे चुकीचे आहे.असाही आरोप प्रा.मूनिश्र्वर बोरकर यांनी केला आहे.बौद्ध बांधवाच्या दिलेल्या वर्गणीवर अशा प्रकारे डल्ला मारणे व स्वतःला मोठे म्हणवून घेणे तसेच मिळालेल्या संपूर्ण रकमेचा हिसोब आयोजकांनी मागितलेल्या प्रमाणे न देणे सदर बाब चुकीची असल्याने अशांवर कार्यवाही होणे अपेक्षित आहे.अन्यथा ‘आम भरो व स्वतःचे पोट भरो’ करणाऱ्याला वर्गणी देणार कोण? हे तितकेच महत्त्वाचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!