Tuesday, July 28, 2026
Homeचंद्रपूरचौघांचा ग्रामसेवकाशी झाला वाद; ग्रामसेवकास ग्रामपंचायतीत कोंडून चौघेही झाले पसार...- अखेर ११२ नंबर...

चौघांचा ग्रामसेवकाशी झाला वाद; ग्रामसेवकास ग्रामपंचायतीत कोंडून चौघेही झाले पसार…- अखेर ११२ नंबर डायल करून केली स्वतःची सुटका….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर(चिमूर) :- तालुक्यातील वाघोडा येथे ग्रामपंचायतीतर्फे खड्डे खोदकाम सुरू असतांना आरोपींनी खड्डे नसल्याचा आरोप करीत ग्रामसेवक संजय ठाकरे यांच्याशी वाद घातला.वाद इतके विकोपाला गेले की,आरोपींनी चक्क ग्रामसेवकालाच ग्रामपंचायतीत कोंडून पसार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी वाघोडा येथे उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की,खड्डे खोदकाम सुरू असतांना कामावर सात मजुर कार्यरत होते.सदर कामाची देखरेख गावातील रोजगार सेवक रमेश गजभिये यांच्याकडे सोपविण्यात आली.त्यानुसार खड्डे खोदकाम सुरू होते.मात्र ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संजय ठाकरे कर्तव्य बजावित असतांना आरोपी राजू कावळे,प्रभाकर रणदिवे,उमेश मगरे व सुधाकर ढोक हे ग्रामपंचायतीत असणाऱ्या ग्रामसेवक यांच्याशी वाद घालू लागले व सदर कामावर खड्डे नसल्याचा आरोप  करू लागले.वाद घालीत असतांनाच क्षणाचाही विलंब न लावता ग्रामपंचायतीत असणाऱ्या ग्रामसेवक यांना आतमध्ये कोंडून चावी घेऊन चौघेही आरोपी पसार झाले.

ग्रामसेवक यांनी आरडा-ओरड केली.मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने अखेर ठाकरे यांनी ११२ नंबर डायल करून चिमूर पोलीस प्रशासनास कळविले असता पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन बंद असलेला दा कुलूप तोडून ग्रामसेवकाची कोंडून ठेवलेल्या खोलीतून सुटका केली व आरोपी राजू कावळे,प्रभाकर रणदिवे,उमेश मगरे व सुधाकर ढोक या चौघांवर सरकारी कर्मचाऱ्यांशी वाद घालणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत विविध जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्याने कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी...

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!