Thursday, June 25, 2026
Homeचंद्रपूरकोरपना येथे घर फोडी; अज्ञात चोरट्यांनी ५३ हजाराचा ऐवज केला लंपास...

कोरपना येथे घर फोडी; अज्ञात चोरट्यांनी ५३ हजाराचा ऐवज केला लंपास…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोरपना ता.प्र./नितेश केराम

कोरपना(चंद्रपूर):- कोरपना शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील सुरेश आपटे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास जवळपास ५३ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना आज २८ मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

अज्ञात चोरट्यांनी आपटे कुटुंबीय रात्री गाढ झोपेत असतांना संधीचे सोने केले आहे.घरामध्ये घुसून चोरट्यांनी कपाटात ठेवलेला सोन्याचा गोप (मंगळसुत्र),सोन्याची डल व चांदीचे जुने चाळ (जोडवे)असा एकूण ५३ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला आहे.आपटे कुटुंबीय रात्री गाढ झोपेत असल्याने कुठल्याही प्रकारची भनक त्यांना लागली नाही.मात्र पहाटे उठल्यानंतर घरातील कपाट उघडे व त्यातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले.लगेच त्यांनी संपूर्ण साहित्य तपासून पाहिले असता ५३ हजाराचा ऐवज लंपास केल्याचे दिसून आले.सदर प्रकरणी कोरपना पोलीस ठाण्यात तत्कार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.पुढील तपास ठानेदार संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!