- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या गराडा-बासोरा मार्गावर काल, सोमवार २६ ऑक्टोंबरच्या रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली.अमित भीमराव राऊत वय ३१ वर्षे,रा.बासोरा, ता.जि.भंडारा असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अमित राऊत हा दुचाकी वाहनाने नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील वेलतूर येथे टाईल्सच्या कामावर गेला होता.दिवसभर काम करून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने एका सहकाऱ्यासह व दुसऱ्या दुचाकीवर अन्य तिघेजण आंभोरा मार्गाहून गराडा-बासोरा जंगलमार्गे निघाले असता रात्रीच्या अंधारात दबा धरून बसलेल्या दोन वाघांनी अमितच्या दुचाकीवर झडप घातली.यामुळे तो दुचाकीसह खाली कोसळला.त्याच्यासोबत मागे बसून असलेला सहकारी जिवाच्या आकांताने गावाकडे पळत सुटला.तर अन्य दुचाकीवरील सोबतीही गावाकडे पळाले.त्याचवेळी वाघांनी अमितवर हल्ला चढवून जागीच ठार केले.घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आणि दोन्ही गावातील गावकऱ्यांनी मोठा जमाव करून वनविभागाप्रति तीव्र रोष व्यक्त केला.वाघांचा तात्काळ बंदोबस्त करून परिसरात गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
- Advertisement -

