Monday, October 19, 2026
Homeभंडाराभरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका अज्ञात भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लाखांदूर ते पवनी मार्गावरील परसोडी(नाग)गावाजवळ घडली.लोमेश मधुकर राऊत वय २४ वर्षे,रा.कुडेगाव असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
लोमेश राऊत हा काही कामानिमित्त लाखांदूरला गेला होता.तेथील कामे आटोपून सायंकाळच्या सुमारास  दुचाकीने स्वगावी जात असतांनाच लाखांदूर-पवनी मार्गावरील परसोडी(नाग)गावाजवळ एका अनियंत्रित  भरधाव ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.सदरचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास येताच घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू करून पोलिसांना पाचारण केले.अज्ञात वाहन धडक देऊन पसार झाला. दरम्यान,लोमेशला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता अनुदानित खतांचे मोबाईलवरून होणार बुकिंग; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील खत विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी रब्बी हंगाम २०२६ मध्ये येत्या,गुरुवार २२ ऑक्टोंबर पासून ‘एफएफएस’(फार्मर फर्टिलायझर सिस्टीम)ही डिजिटल...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अटींमध्ये सुधारणा.. -आता पात्र विद्यार्थ्यांना दहा महिन्यांसाठी ३८ ते ४३ हजार रुपये अर्थसहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई...

चारचाकी वाहनातुन दारु तस्करी; देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई.. -९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात दारु बंदीचा पुरता फज्जा उडाला आहे.दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची अवैध दारू पकडली जाते.मात्र,दारूची तस्करी थांबण्याचे नावच घेत नाही.कारण...

बिबट्याची चिमुकल्यावर अचानकपणे झडप; नागरिकांनी आरडाओरड केल्याने थोडक्यात बचावला..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :- जिल्ह्याच्या बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावरील विसापूर येथील चुनाभट्टीजवळ एका नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने अचानकपणे झडप घातली आणि जबड्यात पकडून बॉटनिकल गार्डनच्या उंच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!