Tuesday, October 13, 2026
Homeसिंदेवाहीअखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी...

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा चर्चेला आला होता. शहरातील आवश्यक ठिकाणी गतीरोधक नसल्यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचा प्रश्न निर्माण होत होता.परिणामी,अपघातांचा संभाव्य धोका वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन महामार्गावरील आवश्यक ठिकाणी गतीरोधक बसविण्यास मंजुरी देण्यात आली.त्यानुसार आज मंगळवारपासून गतीरोधक बसविण्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात असल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.
पार पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.दरम्यान,सिंदेवाही सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता एल. एस.वानखेडे यांनी बैठकीत गतीरोधकांचे तांत्रिक महत्त्व आणि त्यांची उपयुक्तता विशद केली.शहरातील वर्दळीच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी गतीरोधक आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.गतीरोधकांअभावी अपघातांचा धोका तसेच सिंदेवाही शहरातून जाणारा राज्य महामार्ग क्रमांक-९ हा वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मार्ग आहे.या मार्गावरील काही आवश्यक ठिकाणी गतीरोधक नसल्यामुळे भरधाव वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका निर्माण होत होता. विशेषतः पादचारी,दुचाकीस्वार आणि रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा बनला होता.त्यामुळे महामार्गावरील आवश्यक ठिकाणी गतीरोधक बसविण्याची गरज व्यक्त होत होती.
  • रस्ता सुरक्षेला मिळणार बळ👇
रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आवश्यक ठिकाणी गतीरोधक बसविण्यास मंजुरी मिळाल्याने आता प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होत आहे. गतीरोधकांमुळे वाहनचालकांना वेग कमी करण्यास मदत होऊन संभाव्य अपघातांचा धोका कमी होण्याची अपेक्षा आहे.गतीरोधक योग्य तांत्रिक निकषांनुसार बसविणे आणि वाहनचालकांना पूर्वसूचना देणारे फलक लावणेही सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.सिंदेवाही शहरातील राज्य महामार्ग क्रमांक-९ वर गतीरोधक बसविण्याच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाला महत्त्व प्राप्त झाले आहे.या कामामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची आत्महत्या; आदिवासी विकास मंत्र्यांकडून दखल.. -अधीक्षिकेच्या निलंबनाचे निर्देश; कुटुंबीयांना दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय आश्रमशाळेत इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीच्या आत्महत्येच्या घटनेची आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!