- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील धोप येथील ५३ वर्षीय शेतकरी राजेंद्र अमर सपाटे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली.नुकतेच शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी मोहाडी तालुक्यातील हिवरा, जाम,कांद्री या गावांसह धोप येथे भेट देऊन पिकांची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी राजेंद्र सपाटे यांनी रडत-रडत आपल्या समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या.त्यानंतर अवघ्या पाचच दिवसांत त्यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे,राज्य शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा करतांना भंडारा जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश केला आहे.मात्र,मोहाडी आणि तुमसर तालुक्यांचा त्यात समावेश नसल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत.घटनेची माहिती मिळताच अप्पर जिल्हाधिकारी जाधव,उपविभागीय अधिकारी दिघे,मोहाडीच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे व अन्य अधिकाऱ्यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.माजी खासदार मधुकर कुकडे,माजी आमदार चरण वाघमारे यांनीही घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.दरम्यान,मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
- Advertisement -

