- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला.ही घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील चिचबोडी गावात काल शनिवारच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.दिलीप मुकरू मलोडे वय ३० वर्षे असे आरोपी मुलाचे नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे.तर मुकरू कवडू मलोडे वय ५५ वर्षे असे मृतक वडिलाचे नाव आहे.
सावली तालुक्याच्या चिचबोडी येथे वास्तव्यास असणारे मुकरू मलोडे हे मिळेल ते काम करून आपला गुजारा करतात.अश्यातच मुलगा दिलीप हा बेरोजगार असल्याने कामाच्या शोधात होता.मात्र, मागील काही दिवसांपासून मुकरू मलोडे आणि दिलीप यांच्यात जेवणाच्या कारणावरून शाब्दिक बाचाबाची व्हायची.अश्याच प्रकारे काल शनिवारच्या रात्रीही दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात मुलाचा राग अनावर झाला आणि त्याने हातात काठी पकडुन वडिलांना काठीने बेदम मारहाण केली. यात मुकरू मलोडे हे गंभीर जखमी झाले आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच सावली पोलिसांचे पथक घटनास्थळी झाले व मुकरू यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.मारहाणीनंतर आरोपी मुलगा दिलीप मलोडे हा फरार झाला असून त्याच्या शोधासाठी सावली पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
- Advertisement -

