Thursday, September 17, 2026
Homeआरमोरीधान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; आमदार मसरामांकडून कृषी विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना..

धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव; आमदार मसरामांकडून कृषी विभागाला तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील विविध भागांत धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त होताच तक्रारींची तात्काळ दखल घेत आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी तालुका कृषी अधिकारी गेडाम यांच्यासोबत आज,गुरुवार १७ सप्टेंबर रोजी आरमोरी येथील विश्रामगृहात बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या विविध तक्रारी व समस्या कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत धान पिकाचे नुकसान टाळण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे तसेच प्रत्यक्ष गावागावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार मसराम यांनी सांगितले.
यासंदर्भात आमदार मसराम यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गडचिरोली प्रीती हिरळकर तसेच कृषी विकास अधिकारी गडचिरोली खोमणे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून धान पिकावरील रोगाची तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
“आज आपण तातडीने उपाययोजना केली नाही,तर पुढील १५ ते २० दिवसांत शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घासही हिरावला जाऊ शकतो.कृषी विभागाने विलंब न करता गावागावात पोहोचून धान पिकाची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन व आवश्यक उपाययोजना उपलब्ध करून द्याव्यात,” असे आमदार मसराम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान,पूर्वी शेतकऱ्यांना औषधे,खते आणि इतर कृषी निविष्ठा अनुदानावर उपलब्ध होत होत्या.मात्र आता अनेक योजनांचा लाभ केवळ शेतकरी गटांपुरता मर्यादित राहत असल्याने सामान्य शेतकरी या सुविधांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.अनुदानावरील औषधे,खते व आवश्यक कृषी निविष्ठांचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे,असे मत व्यक्त करत आमदार मसराम यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.शेतकऱ्यांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहून शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याची गरज आहे,असेही  मसराम यांनी यावेळी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शाळांच्या गुणवत्तावाढीला बळ; पवित्र पोर्टलच्या माध्यमातून देसाईगंज नगरपरिषद शाळांना मिळाले सहा नवे शिक्षक.

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नगरपरिषद देसाईगंज अंतर्गत शाळांमधील शैक्षणिक मनुष्यबळाची कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे सहा नवनियुक्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे नियुक्ती...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पारंपरिक कारागीर व शिल्पकारांचा टूल किट व कर्ज मंजुरी पत्र वाटप सोहळा’ संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या श्रमाला उत्पादकतेची जोड देणे आवश्यक आहे.पारंपरिक कारागीर,शिल्पकार आणि असंघटित...

सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा सफल; मनोज जरांगे पाटलांचे उपोषण मागे..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२६ पासून सुरू केलेल्या उपोषणाची सांगता तब्बल २० व्या दिवशी संपुष्टात आल्याने...

आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांचा कुरखेडा शहर विचार मंचाच्या वतीने गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ.जे.पी.नाईक आदर्श प्राचार्य’ पुरस्कार प्राप्त करून श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.राजाभाऊ मुनघाटे यांनी गडचिरोली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!