Saturday, September 12, 2026
Homeदेसाईगंजनैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी ‘तान्हा पोळा’ अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून ‘शाळा ही केवळ चार भिंतींची शिक्षणसंस्था नसून संस्कार,संस्कृती आणि समाजजागृतीचे केंद्र आहे’, हा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.विद्यार्थी,शिक्षक, पालक,ग्रामस्थ,महिला मंडळ आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागामुळे संपूर्ण नैनपूर गाव एकवटल्याचे सुंदर चित्र या प्रसंगी पाहायला मिळाले.
  • शिवलिंग व नंदीबैल पूजनातून संस्कृतीची ओळख👇
कार्यक्रमाची सुरुवात शिवलिंग पिंड व नंदीबैल पूजनाने करण्यात आली.या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते प्रज्ञा तिघरे यांनी साकारलेले शिवलिंग पिंड व नंदीबैलाचे आकर्षक प्रतिकृती स्वरूपातील कलाकृती.या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या भारतीय संस्कृती, श्रद्धा,परंपरा आणि कृषी जीवनाशी जोडलेल्या सणांचे महत्त्व समजावून देण्यात आले.
  • विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारातून संस्कृतीसोबत सामाजिक संदेश👇
तान्हा पोळ्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम,नृत्य आणि सामाजिक विषयांवरील लघुनाटिका सादर केल्या.विशेष आकर्षण ठरलेली ‘मोबाईलचा अति वापर’ या विषयावरील लघुनाटिकेतून विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करण्याचा प्रभावी संदेश दिला.एकीकडे परंपरेचे जतन,तर दुसरीकडे आधुनिक काळातील सामाजिक प्रश्नांवर जागृती,असा सुंदर संगम विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून घडून आला.
  •  विद्यार्थ्याच्या आनंदात सामाजिक सहभाग👇
या सोहळ्यात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नगर परिषद देसाईगंजचे आरोग्य सभापती चैतनदास विधाते यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय उपयोगी किट देण्यात आले.तसेच नगरसेविका जोत्सना लुटे यांच्या वतीने प्रत्येक विद्यार्थ्याला खाऊचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्यांना मिळालेले प्रोत्साहन हे या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य ठरले.
‘विद्यार्थ्यांच्या प्रगतीत समाजाचा सहभाग असेल,तर शाळेची वाटचाल निश्चितच अधिक सक्षम होते,’ याचा प्रत्यय या उपक्रमातून आला.
  • तान्हा पोळा स्पर्धेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी👇
तान्हा पोळा स्पर्धेसाठी नगर परिषद देसाईगंजचे शिक्षण सभापती बाळकृष्ण माडूलवार यांच्या वतीने पारितोषिके देण्यात आली.
प्रथम क्रमांक – ₹१,००१/- : कुंज नामदेव चांदेवार
द्वितीय क्रमांक – ₹७०१/- : पूर्वांशी कमलेश मुळे
तृतीय क्रमांक – ₹५०१/- : ओवी अरविंद तलमले
विजेत्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन दिले.
  • शाळेच्या उपक्रमाला मान्यवरांची साथ👇
या कार्यक्रमाला आमदार रामदास मसाराम, आरमोरी विधानसभा क्षेत्र,माजी आमदार कृष्णा गजबे,नगर परिषद देसाईगंजच्या अध्यक्षा लता सुंदरकर, उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी,आरोग्य सभापती  चैतनदास विधाते, नगरसेवक राजेश जेठानी,नगरसेविका जोत्सना लुटे, नगरसेवक विकास प्रधान,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,धनपाल मिसार,अण्णाजी तुपट, गोपाल चौधरी,दुबे महाराज,गंगाधर चांदेवार,उमाकांत कवासे,रामेश्वर कांबळे यांचेसह मुख्याध्यापक खेमराज तिघरे,शिक्षकवृंद,पालक,ग्रामस्थ,महिला मंडळ आणि बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या नृत्य व लघुनाटिकेसाठी भारती राऊत,  अपर्णा जडे आणि तृषाली सुखदेव यांनी मार्गदर्शन केले.तर विद्यार्थी नोंदणी व निकाल तयार करण्याचे कार्य प्राची खरकाटे व प्रियंका तलमले यांनी केले.उपस्थितांचे स्वागत शिक्षक ईश्वर गहाणे यांनी केले,तर कार्यक्रमाचे प्रभावी संचालन व आभार प्रदर्शन शिक्षक मंगेश तुपट यांनी केले.या तान्हा पोळा उत्सवाने महात्मा गांधी शाळा आणि नैनपूर ग्रामस्थ यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते अधिक दृढ केले.शाळेतील विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा शाळेच्या उपक्रमांवरील समाजाच्या विश्वासाचे प्रतीक ठरला.परंपरा जपणारे संस्कारक्षम विद्यार्थी,सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे जागरूक नागरिक आणि समाजाशी घट्ट नाते असलेली शाळा घडविण्याचा संकल्प या कार्यक्रमातून अधोरेखित झाला.अशा या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड ही शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच संस्कार,संस्कृती,कला, सामाजिक जाणीव आणि सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!