Saturday, September 12, 2026
Homeनागपूरबापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. -...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड फेकली आणि कॅश काऊंटरवरील तब्बल ४ लाख ५३ हजार रुपयांची रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना गुरुवार १० सप्टेंबर रोजी नागपूरच्या सक्करदरा परिसरातील(भांडे प्लॉट)स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडली.मात्र,बँक कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात सक्करदरा पोलिसांना मोठे यश आले.या थरारक घटनेचा प्रकार बँकेत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.सुरज बोरकर वय २८ वर्षे असे आरोपी तरुणाचे नाव असून तो उच्चशिक्षित आहे.
नागपूरच्या सक्करदरा परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील कर्मचारी नेहमीप्रमाणे कामे करीत बसली होती.सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान बँकेतील कर्मचारी कामात व्यस्त असतांनाच आरोपी तरुण बँकेत शिरला आणि कॅश काऊंटरवर जाताच त्याने लाल मिरचीची पूड काढली आणि क्षणाचाही विलंब न लावता समोर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांत फेकायला सुरुवात केली.अचानक घडलेल्या प्रसंगाने कर्मचाऱ्यांनी पळापळी सुरू केली.याचवेळी आरोपीने कॅश काऊंटरवरील ४ लाख ५३ हजाराची रोकड पळवून नेली.घटनेनंतर बँक कर्मचाऱ्यांनी तातडीने सक्करदरा पोलिसांना माहिती दिली.पोलिस पथक काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले.कर्मचाऱ्यांकडून आरोपीचे वर्णन मिळताच डीबी पथकांसह बीट मार्शलना शोधासाठी रवाना केले.बँकेतील आणि बाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला.दरम्यान,परिसरात नाकेबंदी करून पेट्रोलिंग पथकांना हाय-अलर्ट देण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली व त्याच्याकडून लुटीची रोकडही जप्त केली.या थरारक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
  • व्हायरल व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!