- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा व इतर
सार्वजनिक आरोग्याशी संबंधित खाद्यपदार्थांच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.अश्यातच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे.नुकतेच १५ हून अधिक सौंदर्य प्रसाधनांच्या(फेस क्रीम)उत्पादनावर मोठी कारवाई केली आहे.विशेष म्हणजे,कारवाई केलेल्या सौंदर्य प्रसाधनांमध्ये पारा आणि शिशाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्याने सदरची कारवाई करण्यात आली असून ती बाजारातून परत मागवण्याचे आणि त्यांची विक्री तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.पारा आणि शिसे असलेल्या क्रीममुळे त्वचेची जळजळ,लालसरपणा,पुरळ,त्वचा पातळ होणे अशा समस्या उद्भवू शकतात,त्यामुळे किरकोळ विक्रेते, घाऊक विक्रेते,वितरक आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना या उत्पादनांची विक्री तातडीने थांबवण्याचे आणि सर्व उत्पादन बाजारातून परत मागवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.त्वचारोग तज्ञांच्या मते,पारा आणि शिसे असलेल्या क्रीमच्या सततच्या वापरामुळे हे विषारी धातू शरीरात जमा होतात.सुरुवातीला,त्वचेची जळजळ, लालसरपणा,पुरळ,त्वचा पातळ होणे आणि रंग बदलणे ही लक्षणे दिसतात.मात्र,कालांतराने मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेला गंभीर हानी पोहोचू शकते.त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने ग्राहकांना केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.
- Advertisement -

