- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर येथील काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका ॲड.मेधा भाले यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह,अश्लाघ्य व शिवराळ भाषेचा वापर केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सिंदेवाही भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.यासंदर्भात भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष छाया हाडगे यांच्या नेतृत्वाखाली आज,शुक्रवार २४ जुलै रोजी सिंदेवाही पोलिस ठाण्यामार्फत चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात संबंधित व्हिडिओची चौकशी करून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ॲड.मेधा भाले यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या जबाबदार व्यक्तींनी सामाजिक व सार्वजनिक जीवनातील मर्यादा पाळणे आवश्यक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या घटनात्मक पदावरील व्यक्तीविषयी अश्लाघ्य व अवमानकारक भाषा वापरणे हे अत्यंत गंभीर असून,अशा वक्तव्यांमुळे समाजात संतापाचे वातावरण निर्माण होत आहे.त्यामुळे संबंधित व्हिडिओची सत्यता तपासून दोषींवर कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली.तसेच,ॲड.मेधा भाले या पेशाने वकील असल्याने त्यांच्या वर्तनाची शासनानेही गंभीर दखल घेऊन आवश्यक प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करावी,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई न झाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असाही इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निवेदन सादर करतांना छाया हाडगे,अपूर्वा चिंतलवार,मीनाक्षी दलाल,रक्ष्मी परसावार,अंजली बल्लेवार,शेवंता सामुसाखरे,प्रतिभा मेश्राम,जयश्री करकाडे,चंद्रकला नर्मलवार,मोहिनी गेडाम,निता परसावार,तनुजा रुद्रकार यांच्यासह भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
- Advertisement -

