Wednesday, October 7, 2026
Homeवर्धास्वतःच्याच घरी चालवायचे देहव्यापाराचा अड्डा; पती-पत्नीस अटक..

स्वतःच्याच घरी चालवायचे देहव्यापाराचा अड्डा; पती-पत्नीस अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
वर्धा :-स्वतःच्या राहत्या घरी देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या पती-पत्नीचा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे.दोघेही पती-पत्नी तरुणींना पैशांचे मोठे आमिष दाखवायचे आणि त्यांच्याकडून देहव्यापार करवून घ्यायचे,तसेच देहव्यापाराच्या माध्यमातून मिळणारी काही रक्कम स्वतः कडे ठेवण्याचा गोरखधंदा चालवणाऱ्या दाम्पत्याला वर्धा पोलिसांनी रंगेहात अटक केली.गणेश गोविंदा महाले वय ४३ वर्षे व त्याची ३३ वर्षीय पत्नी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वर्धा शहरातील कारला रोडलगत असलेल्या वैष्णवी कॉम्पलेक्स जवळील नखाते लेआऊट परिसरात रात्री उशिरा पोलिसांनी कारवाई केली.
शहराच्या नखाते लेआऊट परिसरातील एका घरात देहव्यापाराचा अड्डा चालवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने रात्री उशिरा कारला रोड परिसरातील संबंधित घरावर अचानक छापा टाकला.या छाप्यात पती-पत्नीचा गोरखधंदा उघडकीस आला.छाप्या दरम्यान आक्षेपार्ह साहित्य,मोबाईल फोन,ग्राहकांशी संपर्कात वापरत असलेला फोन व इतर साहित्य असा एकूण ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दरम्यान,एका खोलीत नागपूर येथील रहिवासी असलेली ३६ वर्षीय पिडीत तरुणी मिळून आली.या पीडित तरुणीची पोलिसांनी सुटका केली असून तिला सुरक्षित स्थळी पाठवले आहे.विशेष बाब म्हणजे,आरोपी महिला ग्राहकाकडून दीड रुपये घेत होती.पीडितेला प्रत्येक ग्राहकामागे पाचशे रुपये दिले जात होते.हजार रुपये ती तिचा पती गणेश महाले याला देत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. सदरचा अवैध व्यवसाय गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याची माहितीही पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे.याप्रकरणी रामनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशात,पोलिस उपनिरीक्षक सिनुकुमार बानोत,विजयसिंग गोमलाडू,अमर लाखे, संजयसिंग सुर्यवंशी,चंद्रकांत बुरंगे,संजय राठोड,नितेश मेश्राम,अमोल नगराळे,मंगेश चावरे,नवनाथ मुंडे,अल्का कुंभलवार आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!