Friday, October 16, 2026
Homeभंडारातरुणाची हत्या; चार अल्पवयीन मुले अटकेत..

तरुणाची हत्या; चार अल्पवयीन मुले अटकेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शहराच्या पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जलाराम चौक परिसरात काल शुक्रवारच्या मध्यरात्री घडलेल्या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ माजली.कार्तिक विलास भंडारी वय २८ वर्षे,रा.संताजी वॉर्ड,भंडारा असे हत्या झालेल्या मृतक तरुणाचे नाव आहे.तर प्रकरणातील  आरोपी हे अल्पवयीन असून पोलिसांनी काही तासांतच चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन  त्यांच्यावर कलम १०३ (१),१८९(४),१९०,१९१(२) व १९१(३)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विलास काळे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी व पथकाने केली. आरोपींनी भंडारा शहराच्या जलाराम चौक परिसरात जुन्या वादातून कार्तिक भंडारी याचेवर धारदार शस्त्रांसह लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली.या हल्ल्यात कार्तिक गंभीर जखमी झाला.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कार्तिकला नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!