Friday, October 16, 2026
Homeनागपूररेती माफियांच्या सराईत टोळीवर 'मोक्का' अंतर्गत कारवाई..

रेती माफियांच्या सराईत टोळीवर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-प्रशासनाने मनात आणले तर गौण खनिजांचा एक टोपलाही कुणी नेऊ शकणार नाही.पण,कोण अंगाला हळद लावून घेणार? असा प्रकार हल्ली सर्वत्र उघडकीस येऊ लागला आहे.अश्यातच नुकतेच नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांची मुजोरी उघडकीस आली होती.चक्क नायब तहसीलदाराला जेसीबीला लटकलेल्या अवस्थेत सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेऊन धावती जेसीबी काटेरी झुडपांतून चालवण्यात आली. नायब तहसिलदार यांनी जेसीबीला घट्ट पकडुन ठेवल्याने मोठी दुर्घटना होता- होता थोडक्यात बचावली.या घटनेचे पडसाद राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात उमटले आणि विविध स्तरातून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान,नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी गौण खनिजांची अवैधरित्या चोरी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिलेले असतांनाच रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या रेती माफियांविरुद्ध भिवापूर पोलिसांनी धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. बनावट रॉयल्टीच्या आधारे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवून पर्यावरणाची ऐशी-तैशी करणाऱ्या रेती माफियांच्या सराईत टोळी विरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम(मोक्का)अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
कारवाईत टोळी प्रमुख मोहम्मद इनाझुल उर्फ कल्लू तजमुल खान वय ४० वर्षे,रा.रोशनबाग,खरबी चौक, नागपूर याच्यासह टोळीतील सदस्य कैसर अली रियाझुद्दीन अली वय ४७ वर्षे,रा.गरीब नवाज चौक खरबी,नागपूर,सुरज दिलीप गभने वय २७ वर्षे,रा. गुडेगाव,जि.भंडारा,दिनेश मधुकर काकडे वय ३२ वर्षे रा.डोंगरगाव,ता.कुही,जि.नागपूर व इतर पाच जणांचा समावेश आहे.विशेष म्हणजे,मोक्काच्या कारवाईत एकूण नऊ जणांचा समावेश असला तरी पोलिसांनी केवळ चारच आरोपींची नावे उघड केली आहेत. उर्वरित पाच आरोपींची नावे अद्याप पोलिसांनी स्पष्ट केलेली नसल्याने रेतीच्या गोरखधंद्यात गुंतलेल्या इतर माफियांची झोप उडाली आहे.हे पाच जण नेमके कोण? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.या टोळीने केवळ रेतीची अवैध वाहतूकच केली नाही,तर बनावट कागदपत्रे तयार करून शासनाची आर्थिक फसवणूकही केली. भिवापूर,उमरेड,नागपूर,भंडारा जिल्ह्यात या टोळीवर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.टोळीच्या गुन्हेगारी कारवाया थांबत नसल्याने पोलिसांनी ‘मोक्का’चा प्रस्ताव तयार करीत,विशेष पोलिस महानिरीक्षक,नागपूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर केला होता.नुकतीच त्यास मंजुरी मिळाली आणि पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार,अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली भिवापूर पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केली.
गत २४ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिवापूर परिसरात कारवाई करीत,अवैध रेतीची वाहतूक करणारा टिप्पर क्र.एमएच ४० बीझेड १७१७ आणि त्याला एस्कॉर्ट करणारी क्रेटा कार क्र.एमएच ४९ सीडी ४७७७ ही दोन वाहने रेतीसह जप्त केली होती.याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर तपासात आरोपी चक्क बनावट रॉयल्टीचा वापर करून रेतीची वाहतूक करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला.पोलिसांनी लागलीच कैसर अली आणि कल्लू खान यांना अटक केली.यासंपूर्ण प्रकरणात सुरज गभने व दिनेश काकडे यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.न्यायालयाने दिलेल्या सात दिवसांच्या पोलिस कोठडीत आरोपींकडून पोलिसांच्या हाती संघटित गुन्हेगारीचे धागेदोरे लागले आणि मोठी कारवाई करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!