Friday, October 16, 2026
Homeनागपूरपोलिसांना न्यायालयात बिनशर्त मागावी लागली माफी.. - महिलेच्या घरात प्रवेश केल्याचे प्रकरण..

पोलिसांना न्यायालयात बिनशर्त मागावी लागली माफी.. – महिलेच्या घरात प्रवेश केल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-पोलिसांना सर्वकाही माहित असतांनाही काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अंगात ‘पोलीसगिरी’ चा रोप झाडतांना दिसून येतात.मात्र,यांस काहीजण अपवादही आहेत.पोलीस खाते हे संवेदनशील खाते आहे.पोलीस खात्याचा संपर्क थेट जनतेशी येतो.त्यामुळे, चुकीचे वर्तन वा नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या पोलिसांना धडा शिकवणे गरजेचे असते. अश्याच प्रकारे एका मोटार वाहन अपघातात चौकशीसाठी रात्रीच्या सुमारास महिलेच्या घरात प्रवेश करणे पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे.विशेष म्हणजे,महिला घरात एकटीच होती.त्यातच,पोलिसांच्या पथकात ना महिला कर्मचारी होती,ना वॉरंट,तसेच लिखित आदेश किंवा नोटीसही दाखवली नाही.प्रकरणी महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत याबाबत याचिका दाखल केली.न्यायालयाने यावर स्पष्टीकरण मागितले असता पोलिसांना न्यायालयात बिनशर्त माफी मागावी लागली आहे.सदरचे प्रकरण हे नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापा शहरातील आहे.२४ जानेवारी २०२६ रोजी सावनेर तालुक्याच्या खापा पोलिसांनी मोटार वाहन अपघाताचा गुन्हा दाखल केला.प्रकरणात पोलिसांनी २५ जानेवारी रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास खुशबू खान व इद्रीस खान यांच्या घरात प्रवेश केला.त्यावेळी खुशबू खान ह्या घरात एकट्याच होत्या.पोलिसांनी घरात तर प्रवेश केला. पण,पोलिसांच्या पथकात महिला कर्मचारी नव्हती. तसेच,पोलिसांनी या कारवाईसाठी कोणताही वॉरंट, लिखित आदेश किंवा नोटीस दाखवली नाही.खुशबू यांची चौकशी केली व बेडरूममध्ये जाऊन मोबाइल फोन ताब्यात घेतला,असा आरोप याचिकेत करण्यात आला. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड.सिद्धांत घट्टे यांनी बाजू मांडली. प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यावर स्पष्टीकरण मागितले असता खापा पोलिसांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून बिनशर्त माफी मागितली.तसेच,कारवाईच्या दिवशी एकमेव महिला पोलिस कॉन्स्टेबल साप्ताहिक रजेवर होती,असे सांगून भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही,असेही आश्वासन दिले.
विशेषतः भारतात कायद्याने सर्वांना विशेष हक्क दिले आहेत.एखाद्या महिलेला अटक करतांना पोलिस अधिकाऱ्यांना काही विशेष नियम पाळावे लागतात.
एखाद्या महिलेला अटक करण्यासाठी शक्यतो महिला पोलीस अधिकारीच असावी लागते.महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अनुपस्थितीत जर पुरुष अधिकाऱ्यांनी महिला आरोपीला अटक केली तर त्यांना त्या महिलेला स्पर्श करता येत नाही.फक्त महिला अधिकारीच अटकेनंतर महिला आरोपीची झडती घेऊ शकतात. यातही त्यांना शिष्टाचार पाळावा लागतो.विशेष म्हणजे, संध्याकाळी ६ वाजल्यानंतर आणि सकाळी ६ वाजण्यापूर्वी महिलेला अटक करता येऊ शकत नाही. फक्त अत्यावश्यक असेल तरच या काळात महिलेला अटक केली जाऊ शकते.त्यासाठी आधी न्यायाधीश (ज्युडिशियल मॅजस्ट्रेट)यांची परवानगी घ्यावी लागते. घटनेच्या आर्टिकल ३९ए नुसार ज्या व्यक्तींना कायदेशीर मदत घेणे परवडणारे नसते,त्यांना मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा अधिकार आहे.त्यांना कायदेशीर मदत पुरवणे ही त्या यंत्रणेची जबाबदारी आहे.म्हणूनच सध्या स्थितीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा स्तरावर कार्यरत आहेत.प्राधिकरणाच्या माध्यमातून मोफत वकील मिळत असतो.
एनसीआयबी म्हणजेच नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या वेबसाईटवरील माहितीनुसार,भारतातल्या पोलिसांना कोणत्याही व्यक्तीला चौकशीसाठी डीटेन  करता येत नाही.त्यासाठी,त्या व्यक्तीला वॉरंटसह अटक झालेली असावी लागते.काही केसेसमध्ये वॉरंटशिवायही अटक करता येते.अटक वॉरंट म्हणजे एखाद्या आरोपीला ताब्यात घेऊन सादर करण्याचे न्यायलयाने पोलिसांना दिलेले लेखी आदेश.हे वॉरंट एखाद्या परिसराची झाडाझडती घेण्यासाठी,एखादी गोष्ट शोधण्यासाठीही असू शकते.हे वॉरंट लेखी असते,त्यावर प्रिसायडिंग ऑफिसरची सही असते आणि त्यावर कोर्टाची सही असते.यामध्ये त्या आरोपीचे नाव,पत्ता,आणि त्याच्यावर कोणत्या गुन्ह्याचा आरोप आहे,याचेही तपशील असतात. यापैकी एखादी जरी गोष्ट वॉरंटवर नसेल,तर ते वॉरंट वैद्य ठरत नाही आणि असे वॉरंट वापरून केलेली अटक ही बेकायदेशीर ठरते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!