Sunday, August 30, 2026
Homeनागपूरघरमालकाच्याच अल्पवयीन मुलीवर डोळा; मुलगी चार महिन्यांची गर्भवती..

घरमालकाच्याच अल्पवयीन मुलीवर डोळा; मुलगी चार महिन्यांची गर्भवती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरच्या एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.चक्क किरायदार म्हणून वास्तव्यास असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाने घरमालकाच्याच अल्पवयीन मुलीवर डोळा टाकून पहिल्यांदा मुलीशी ओळख वाढवली.त्यानंतर,मैत्री करून जाळ्यात ओढले व वारंवार लैंगिक अत्याचार केला. यात ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड होताच मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.सिम्बा ठाकरे वय २३ वर्षे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.तर पीडित अल्पवयीन मुलगी दहावीत शिक्षण घेते.विशेष म्हणजे,मुलगी वारंवार उलट्या करीत असल्यामुळे तसेच पोट दुखीचा वारंवार त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तिला उपचारार्थ रुग्णालयात नेले.तेथील डॉक्टरांनी तपासून ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.मुलीच्या आईने विचारणा केल्यावर मुलीने घाबरलेल्या अवस्थेत घडलेला प्रकार सांगितला.
आरोपी सिम्बा ठाकरे हा एमआयडीसीतील कंपनीत काम करतो.तो मुलीच्या घरी किरायदार म्हणून राहत होता.घरमालक यांना १६ वर्षाची मुलगी आहे.सिम्बा याने ओळखीचा फायदा घेत सर्वप्रथम मुलीशी ओळख वाढवून मैत्री केली.दरम्यान,५ जानेवारी २०२६ रोजी मुलगी घरात एकटीच असतांना तिच्या घरी गेला.तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मुलीने नकार दिला असता त्याने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर,लग्नाचे खोटे आमिष दाखवून ३० एप्रिलपर्यंत वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.या दरम्यान ती गर्भवती राहिल्याने सदरचा प्रकार उघडकीस आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!