Tuesday, July 14, 2026
Homeभंडारावाघाने महिलेच्या मानेला पकडून नेले फरफटत..

वाघाने महिलेच्या मानेला पकडून नेले फरफटत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-नुकतेच ऐन गुढीपाडव्याच्या दिवशीच मोहफुले वेचण्यासाठी शेतशिवारात गेलेल्या एका ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम रा.बाम्पेवाडा,ता.साकोली,जि.भंडारा या शेतमजुरावर वाघाने अचानकपणे हल्ला चढवून ठार केल्याची घटना गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील बाम्पेवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या उमरझरी-बाम्पेवाडा जंगल परिसरात घडली होती.सदरची घटना ताजी असतांनाच परत आज,शनिवार २८ मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान साकोली तालुक्याच्या उमरझरी शेत शिवारात मिरची तोडत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे.माया रामकृष्ण सोनवाने वय ४८ वर्षे, रा.उमरझरी,ता.साकोली असे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की,माया रामकृष्ण सोनवाने
आणि त्यांचे पती रामकृष्ण सोनवाने हे आज शनिवारच्या सकाळी उमरझरी शेत शिवारात शेतातील हिरव्या मिरच्या तोडत होते.अश्यातच शेतालगतच्या जंगल परिसरातून आलेल्या वाघाने अचानक माया सोनवाने यांच्यावर हल्ला केला आणि महिलेच्या मानेला पकडून अंदाजे दहा फूट अंतरापर्यंत फरफटत नेले.दरम्यान, जवळच असलेल्या रामकृष्ण यांनी आरडाओरडा केली असता बाजूच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडाओरड करून वाघाला पळवून लावले.त्यानंतर गावातील नागरिकांना या घटनेची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी माया सोनवाने यांना खासगी वाहनाने तातडीने साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारार्थ
भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच साकोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक आचरेकर,पोलिस कॉन्स्टेबल संदीप बावनकुळे आणि मधुकर शेंडे यांनी रुग्णालयात पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून माजी जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे,जि.प.सदस्य अविनाश ब्राह्मणकर,माजी जि.प.सदस्य नेपाल रंगारी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली.यावेळी त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांच्याशी चर्चा करून जखमी महिलेला तातडीने आर्थिक मदत,योग्य नुकसान भरपाई आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मोफत देण्याची मागणी केली.घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

वसतिगृहातील गंभीर अनियमिततेवर आमदार मसराम संतप्त.. – आरमोरी येथील वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी शहरातील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहास आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी अचानकपणे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता वसतिगृहातील अनेक...

आज दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज,मंगळवार १४ जुलै रोजी...

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!