- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाचा तिबेट कॅम्प जवळील इटियाडोह जलाशयात मृतदेह आढळून आल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.आशिष जितेंद्र मेश्राम वय २३ वर्षे, रा.बोंडगावदेवी,ता.अर्जुनी-मोरगाव, जि.गोंदिया असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव असून तो रंगपंचमीच्या दिवशी गावातील मित्रांसोबत मौज-मजा करण्यासाठी घराबाहेर पडला होता.त्याच्या सोबत असलेले मित्र घरी परतले,मात्र आशिष रात्र होऊनही घरी परतला नसल्याने काल गुरुवारी त्याच्या वडिलांनी स्थानिक पोलिस ठाण्यात आशिष बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.तत्पूर्वी वडील जितेंद्र व मोठा भाऊ प्रशिक यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला होता. मात्र,त्याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेता मृतक आशिष कुठे गेला होता व कुणासोबत होता,याचा मागोवा घेत असतांनाच इटियाडोह जलाशयात तिबेट कॅम्प जवळ त्याचा मृतदेह आढळून आल्याने कुटुंबीयांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.प्रकरणी पोलीस प्रशासन त्या दिशेने तपास करीत आहेत.
- Advertisement -

