- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या खापरखेडा-कोराडी मंदिर मार्गालगत भरदिवसा घडलेल्या हत्याकांडाने परिसरात एकच खळबळ माजली आहे.शिक्षण घेतांना मामे भावासोबत सुरू असलेले प्रेमप्रकरण पतीच्या नजरेसमोरही प्रकट होऊ लागले.अश्यातच प्रियकराचा त्रास सहन न झाल्याने पती आणि पत्नीने मिळून त्याचा भर दिवसाच खून केला.सागर वानखेडे,रा.येरला(पावडे), ता.नरखेड,जि.नागपूर असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यात नोकरी करायचा व होळीनिमित्त गावी आला होता.सदरची घटना खापरखेडा-कोराडी मंदिर मार्गालगत काल गुरुवारी भरदिवसा साडे अकराच्या सुमारास घडली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राजू गजभिये व त्याची पत्नी सोनाली रा.वॉर्ड क्रमांक-२,खापरखेडा, ता.सावनेर,जि.नागपूर अशी आरोपींची नावे असून हत्या केल्यानंतर ते घरी गेले व घरून ते पोलिस ठाण्याच्या दिशेने गेले.ठाण्याजवळ पोलिसांना दिसताच दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडील चाकू जप्त केला.त्या दोघांनीही सागरची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि सागरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपुरातील मेयो हॉस्पिटलमध्ये पाठवला.याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास कामठी तालुक्याच्या कोराडी पोलिसांकडे वर्ग केला.राजू व सोनाली यांना दोन मुले आहेत.सागर हा राजूच्या पत्नीचा मामेभाऊ असून,दोघांनीही सोबत शिक्षण घेतल्याने त्यांचे आपसात प्रेमसंबंध होते.तिचा विवाह राजू गजभियेसोबत झाल्यानंतरही सागर तिच्या संपर्कात होता.होळी असल्याने सागर त्याच्या मूळ गावी येरला (पावडे)येथे आला होता.तो काल गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास तिला भेटण्यासाठी खापरखेडा येथे गेला होता.तसा मेसेज त्याने तिला इन्स्टाग्रामवर पाठविला होता.वॉर्ड क्रमांक-२ मधील मंगल कार्यालयाजवळ ती सागरच्या मोटारसायकलवर मागे बसली आणि दोघेही खापरखेडा-कोराडी मंदिर मार्गावर गेले.या मार्गावरील कोलार नदीवर असलेला पूल ओलांडताच तिने मुद्दाम पर्स खाली टाकली आणि पर्स उचलण्यासाठी सागरला मोटारसायकल थांबवायला लावली.तिने त्या पर्समध्ये घरून चाकू नेला होता.ती दुचाकीवरून खाली उतरली,पर्समधून चाकू काढून सागरवर वार केले.त्याच वेळी राजू तिथे पोहोचला व त्यानेही त्याच चाकूने त्याच्यावर वार करून त्याची हत्या केली. मार्गाने येणारे-जाणारे हा प्रकार बघत होते.काहींनी याची मोबाइल फोनमध्ये व्हिडीओ क्लिप तयार केली. राजूच्या हातात चाकू असल्याने कुणीही मध्ये जाण्याचे धाडस केले नाही.राजू व त्याची पत्नी सागरला मारत असल्याची माहिती मिळताच ठाणेदार हरीश रूमकर यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.ते घटनास्थळाजवळ पोहोचण्यापूर्वी दोघेही घरी निघून गेले व तिथून दोघांनी पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली.
- Advertisement -

