- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला,तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,मंगळवार ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास तुमसर-भंडारा मार्गावरील खापा-खरबी फाट्याजवळ घडली. आज दुपारच्या सुमारास तुमसरकडून भंडाऱ्याच्या दिशेने चारचाकी वाहन जात होते. दरम्यान,खापा-खरबी गावाजवळ येताच कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की ३२ वर्षीय दुचाकीस्वार गोलू कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला.तर दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची घटना माहीत पडताच परिसरातील नागरिकांचा मोठा जमाव गोळा झाला.संतप्त जमावाने कारवर दगडफेक करून कारची तोडफोड केली आणि तरुणाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून तब्बल चार तास वाहतूक रोखून धरली.प्रसंगी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
- Advertisement -

