Wednesday, September 2, 2026
Homeमुंबईशासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-राज्यातील लाखो शासकीय कर्मचारी तसेच पेंशनधारकांसाठी आनंदाची बातमी असून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज,बुधवार २५ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेत मोठी घोषणा करून शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.यानुसार,आता राज्याचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून वाढून ५८ टक्के झाला आहे.शासनाच्या या निर्णयानुसार,महागाई भत्त्यातील ही वाढ १ जुलै २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.कर्मचाऱ्यांना जुलै २०२५ ते ऑक्टोंबर २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीची रक्कम मार्च २०२६ च्या वेतनासोबत अदा केली जाईल.तसेच,नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या दरम्यानच्या कालावधीतील थकबाकीबाबत शासन लवकरच स्वतंत्र आदेश निर्गमित करणार आहे.या नियोजित निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षाच्या अखेरीस मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील सुमारे ५ लाख ९६ हजार कार्यरत शासकीय कर्मचाऱ्यांना आणि ८ लाख १२ हजार निवृत्तीवेतनधारकांना(पेंशनधारक)मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!