Friday, July 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार २० हजार रुपये हेक्टरी बोनस..

चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार २० हजार रुपये हेक्टरी बोनस..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनचा दुसरा दिवस शेतकरी बांधवांच्या विविध मुद्यांनी गाजला.विशेष म्हणजे,आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करून अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपयांपर्यतचे अनुदान जाहीर केले गेले होते.यासाठी २५ मार्च २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला होता.मात्र अद्याप अनुदानाची रक्कम दिली नसल्याचे मुनगुंटीवार म्हणाले.निधी शेतकऱ्यांसाठी अनुदान देतांना विविध कारणे देऊन टाळले जाते,मात्र आमदारांचा पगार वाढवितांना कोणतेही कारण दाखविले जात नाही,अशी टीका मुंगटीवार यांनी केली.काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवर यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले.शासकीय कर्मचाऱ्यांची वेतनवाढ,भत्ते वाढ यात शासन कुठलेही नियम घालत नाही,मात्र शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घ्यायचा झाला तर बैठका घ्याव्या लागतील,निकष आणि निर्बंध लादले जातील ही शासनाची निती आहे.नुकतेच ११ जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले,त्याचे पंचनामे तात्काळ करून नुकसानभरपाई व धानाचा बोनस देण्यात यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी सभागृहात केली.त्यानुसार,राज्यमंत्री योगेश कदम यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले. ते भरून काढण्यासाठी हेक्टरी २० हजार रुपये जाहीर केलेले अनुदान देण्याबाबत लवकरच मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली.विशेष म्हणजे, चंद्रपूर,गडचिरोली,भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले होते.त्यानुसार,अनुदान देण्याबाबत लवकरच विभागाकडून मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात येईल,असेही राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केल्याचे शेतकऱ्यांचा बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यातील रुग्णालयांत इच्छामरणासाठी विशेष वैद्यकीय समित्या होणार स्थापन; शासन निर्णय जारी..

उद्रेक न्युज वृत्त :-जेव्हा एखादी व्यक्ती अत्यंत गंभीर व्याधीने ग्रस्त आणि दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत राहते, तेव्हा अशी व्यक्ती स्वतः निर्णय घेऊ शकत नाही.अशा वेळी मरण...

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!