Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजप्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा जास्तीत- जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा.. - लता...

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा जास्तीत- जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा.. – लता सुंदरकर नगराध्यक्षा देसाईगंज नगर परिषद

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरातील जास्तीत-जास्त नागरीकांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन(PM-SYM)योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा लताताई सुंदरकर यांनी केले.देसाईगंज नगर  परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,प्रसंगी त्या अध्यक्ष स्थानावरुन बोलत होत्या.
प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेली एक स्वैच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे.ही योजना असंघटित क्षेत्रातील तसेच रस्त्यावरील विक्रेते,कचरा वेचणारे, रिक्षाचालक,बांधकाम कामगार,रोजंदारीवर काम करणारे कामगार,शेती कामगार,बिडी कामगार घरगुती कामगार, विणकर,कारागीर,मच्छीमार,चामडे कामगार व इतर असंघटीत कामगार ज्यांचे मासिक उत्पन्न १५ हजार रुपयांपर्यंत आहे.ज्यांचे वय १८ ते ४० वर्षे आहे,अशा कामगारांना त्यांच्या वयाच्या ६० वर्षांनंतर किमान ३ हजार रुपये मासिक पेन्शन मिळणार आहे.ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना श्रद्धांजली असून जे देशाच्या सकल  देशांतर्गत उत्पादनात(जीडीपी)सुमारे ५० टक्के योगदान देतात.देसाईगंज नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन(PM-SYM)योजना अंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगार व पथविक्रेते यांच्यासाठी विशेष नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून देसाईगंज नगर परिषदेच्या नगराध्यक्षा लता सुंदरकर तर प्रमुख अतिथी म्हणून देसाईगंज नगर परिषदेचे उपाध्यक्ष नरेश विठ्ठलानी,सभापती स्वच्छता,वैद्यक व आरोग्य समिती चैतनदास विधाते,सभापती महिला बालकल्याण भाविआ साधवानी,नगरसेवक मो.युनुस शेख,नगरसेवीका लता मुळे,पार्वता बेदरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.या शिबीरास जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सीएससी सेंटरचे जिल्हा व्यवस्थापक सुरज खोब्रागडे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमांचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे तर सुत्रसंचालन समुदाय संघटक अरुण मोटघरे यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता,सीएससी सेंटरचे केंद्र चालक संतोष कोरे,खेमानंद मेश्राम,सचिन दुफारे,अस्तित्व शहर स्तर संघाच्या सचिव कल्पना वासनिक,समुदाय संसाधन व्यक्ती आरती ठाकरे,वैष्णवी आकरे,नरगिस पठाण,रिझवाना पठाण,माधुरी चांदेवार व नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!