Monday, July 13, 2026
Homeचंद्रपूरअखेर सत्तानाट्याचा शेवट; भाजपची गुगली.. -चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर..

अखेर सत्तानाट्याचा शेवट; भाजपची गुगली.. -चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपचा महापौर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शहरातील महानगरपालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्याचा अखेर आज, मंगळवार १० फेब्रुवारीला नाट्यमय शेवट झाला.भाजपने शेवटच्या क्षणी गुगली टाकून चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपद आपल्या पदरी पाडून घेतले.भाजपच्या संगीता खांडेकर यांची अवघ्या एका मताने महापौरपदी वर्णी लागली आहे.विशेष म्हणजे,भाजप आणि ठाकरे गटामध्ये सत्तेच्या वाटणीचा ‘सव्वा-सव्वा’ वर्षांचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे.पहिली सव्वा वर्षे भाजपकडे,त्यानंतरची सव्वा वर्षे ठाकरे गटाकडे असेल(प्रत्येकी दोन टर्म).ठाकरे गटाचे प्रशांत दानव हे पाच वर्षे उपमहापौर राहतील. पहिल्या आणि चौथ्या वर्षाचे सभापतीपद ठाकरे गटाला देण्यात आले आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेत ६६ जागांपैकी काँग्रेसकडे २७ जागा असूनही त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. काँग्रेसच्या उमेदवार वैशाली महाडोळे यांना ३१ मते पडली.तर संगीता खांडेकर यांना ३२ मते मिळाली.चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण ६६ जागा असून सत्ता स्थापनेसाठी ३४ नगरसेवकांचे संख्याबळ आवश्यक होते.मात्र,वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहिल्याने बहुमताचा आकडा कमी झाला आणि भाजपसाठी संधी निर्माण झाली.भाजपकडे २३ आणि ठाकरे गटाकडे ६ जागा आहेत.जोरगेवार म्हणाले की, “आमच्या नेत्यांची महापौरपद सोडण्याची इच्छा नव्हती,पण शहराच्या विकासासाठी आणि स्थिर सत्तेसाठी आम्ही ठाकरे गटाची मागणी मान्य केली.”आज सकाळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिहे यांची बैठक झाली.या बैठकीत ठाकरे गटाने महापौरपदाची मागणी केली होती,मात्र वडेट्टीवार पाच वर्षांच्या कार्यकाळात एकदाही महापौरपद देण्यास तयार नव्हते.यामुळे संतापलेले संदीप गिहे बैठकीतून तडकाफडकी बाहेर पडले.त्यानंतर,काही वेळातच भाजपचे स्थानिक नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिल्याची अधिकृत घोषणा केली आणि सत्तानाट्याचा शेवट होऊन भाजपची गुगली कामी पडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

यालाच म्हणतात खरे राजकारण..! स्थानिक आमदारांची चुप्पी; तर बाहेरच्या आमदारांना चिंता..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-काही कालावधीपासून राज्याच्या विविध भागात अवैध रेती उत्खनन आणि रेती तस्करीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.रेतीतून मिळणारा बक्कळ पैसा अनेकांना करोडपती,तर काहींना रोडपती...

तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त; दोन आरोपींना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीत नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५४ किलो ९९८ ग्रॅम गांजा जप्त करून दोन आरोपींच्या मुसक्या...

सिंदेवाहीत माकडांची दहशत कायम; दोन दिवसांत दोन जणांवर हल्ले,नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरात माकडांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला असून दोन दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले झाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे वनविभागाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!