- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-राजकारणाची धुरा सांभाळणे मामुली गोष्ट नाही.निवडून येण्यासाठी जशी रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते,त्याहीपेक्षा सत्ता स्थापनेसाठी जीवाचे रान करावे लागते.केवळ निवडून आले म्हणजे झाले असे नाही,तर ज्यांची आवश्यकता आहे,अश्यांना भाऊ बटा करून सोबती बनवल्याशिवाय पर्याय नाही आणि असाच प्रकार हल्ली चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकीय समीकरणात पहावयास मिळत आहे.या ठिकाणी अद्याप सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटेना.! असे झाले आहे.त्यामुळे वरिष्ठांच्या भेटी-गाठी वाढलेल्या दिसून येत आहेत. नुकतेच चंद्रपुरातील उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आणि बहुजन वंचित बहुजन युतीच्या ८ नवनिर्वाचित नगरसेवकांसह २ अपक्षांनी मुंबईच्या मातोश्रीवर जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत उपस्थित होते.आपल्याला जो पक्ष सन्मानाने सहकार्य करेल,अशा पक्षासोबत सत्ता स्थापन करा आणि स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या,असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला होता.अश्यातच आता आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.विशेष म्हणजे,चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २३ जागांवर तर शिवसेच्या शिंदे गटाला १ जागेवर विजय मिळाला असून,महायुतीकडे सध्या एकूण २४ नगरसेवकांचे संख्याबळ आहे.तर काँग्रेस पक्षाकडे २८ नगरसेवक आहेत.मात्र,६६ सदस्यांच्या महानगरपालिकेत स्पष्ट बहुमतासाठी किमान ३४ नगरसेवकांची आवश्यकता असून,महायुती अद्याप बहुमताच्या आकड्यापासून दूर आहे.तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे ६ नगरसेवक,वंचित बहुजन आघाडीचे २ नगरसेवक असे या आघाडीचे ८ नगरसेवक निवडून आले आहेत.चंद्रपुर महानगरपालिकेत एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता समीकरणात शिवसेनेला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सत्तेच्या समीकरणात कोण बाजी मारणार? हे सांगताच येत नाही.कारण हे राजकारण आहे; यावर अधिक बोलणे उचित नाही.असेच म्हणावे लागेल.
- Advertisement -

