Thursday, May 28, 2026
Homeभंडाराअवैध रेती तस्करी; पाच आरोपी अटकेत.. - जेसीबी,टिप्परसह ट्रॅक्टर जप्त..

अवैध रेती तस्करी; पाच आरोपी अटकेत.. – जेसीबी,टिप्परसह ट्रॅक्टर जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्यात अवैध रेती तस्करीने चांगलाच उच्छाद मांडला आहे.येथील काही एसडीओ,तहसीलदार व इतर कर्मचाऱ्यांवर कारवाया होऊनही बेइज्जत होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे.स्थानिक पातळीवरील अधिकारी,कर्मचारी अंगाला हळद लावून घेत नसल्याने चक्क जिल्हा प्रशासनास अवैध रेती उत्खनन व वाहतूक प्रकरणी कारवाई करावी लागत असल्याचा प्रकार भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात उघडकीस आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने लाखांदूर तालुक्यातील साखरा घाट परिसरात मध्यरात्री धाड टाकून अवैध रेती तस्करी करणारी १ जेसीबी,दोन टिप्पर आणि एक ट्रॅक्टरसह सुमारे ७८ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.लाखांदूरचे नायब तहसीलदार दत्ता धकाते यांच्या फिर्यादीवरून,दिघोरी पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ३० लाखांचा टिप्पर,१२ लाखांचा मिनी टिप्पर,६.५ लाखांचा ट्रॅक्टर आणि ३० लाखांची जेसीबी असा एकूण ७८.८६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.दिघोरी पोलिसांनी या प्रकरणी चेतन शामराव देशमुख,सतीश शंकर आगासे, कमलेश शामराव बावनकुळे,शंकर वामन मटे आणि राकेश धनु साळवे सर्व रा.दिघोरी यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२),३(५)व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला आहे.पुढील तपास दिघोरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवादार विलास मातेरे करीत आहेत. कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!