Thursday, May 28, 2026
Homeभंडारानियतीने डाव साधला..! उद्याला लग्न अन् ट्रक अपघातात मृत्यू..

नियतीने डाव साधला..! उद्याला लग्न अन् ट्रक अपघातात मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-ईश्वराची किमया ही न्यारीच म्हणावी लागेल. पृथ्वी तलावावर पाठवणाराही तोच आणि त्याला वाटेल तेव्हा घेऊन जाणाराही तोच.मात्र,सर्वत्र आनंदाचे वातावरण असतांनाच नियतीने डाव साधला तर.. अनेकांचे काळीज फाटल्याशिवाय राहणार नाही.अशीच काळीज हेलावणारी घटना भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिपरी जवळील कवडसी फाट्यानजीक गुरुवारच्या रात्री ८ वाजता घडली.अवघ्या दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपलेले असतांनाच ३३ वर्षीय तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.दुर्गेश लांजेवार वय ३३ वर्षे,रा.आंबेडकर वॉर्ड,ता.जि.भंडारा असे अपघातात मृत पावलेल्या  तरुणाचे नाव आहे.दुर्गेश हा तीन महिन्यांपूर्वीच एसटी महामंडळात बस चालक म्हणून रुजू झाला होता.काल शुक्रवारी मेहंदीचा कार्यक्रम तर उद्या,रविवार ११ जानेवारीला त्याचे गावातीलच एका तरुणीशी लग्न होणार असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते.अश्यातच तो घटनेच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या रात्री काही कामानिमित्त कवडसी फाट्याजवळ गेला होता.पायवाटेने रस्ता ओलांडत असतांनाच भंडाराकडून नागपूरच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एमएच १४ एलएक्स ४२१९ क्रमांकाच्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली.धडक इतकी भीषण होती की दुर्गेशच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि दोन्ही कुटुंबियांच्या आनंदावर दुःखाचे सावट पसरले.अपघातानंतर काल शुक्रवारी दुर्गेशचे अंत्यसंस्कार पार पडले.प्रकरणी जवाहरनगर पोलिसांनी अपघातातील ट्रक आणि चालकास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला.घटनेचा पुढील तपास पीएसआय भिमाजी पाटील करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

अजब-गजब कारनामा..! वसतिगृहात कुलरची मागणी केली म्हणून विद्यार्थिनीला हकालपट्टीची नोटीस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या विदर्भात तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. यामुळे जीवाची लाही-लाही होत आहे.प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.त्यातच,पंखे व इतर हवेच्या साधनांनी...

‘आंबा महोत्सव-२०२६’; गडचिरोलीसह भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील २१७ गावांमधून संकलित केलेल्या आंबा वाणांचे प्रदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक धान पिकासोबतच अधिक उत्पन्न देणाऱ्या फळपिकांकडे वळावे.आंबा हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड करणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!