- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-एका २३ वर्षीय तरुणीला आपण लग्न करू,असे सांगून वारंवार लैंगिक अत्याचार केला. पण,तरुणीने लग्नासाठी विचारले असता स्पष्ट नकार दिला.प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.तरुणीच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.विक्की राजेश अवचट वय २८ वर्षे,रा.मोठी दिघोरी,ता.लाखांदूर,जि.भंडारा असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून तो लडाख येथे भारतीय सैन्यदलात कार्यरत आहे.तर प्रकरणातील २३ वर्षीय पीडिता पालांदूर परिसरातील रहिवासी आहे.
तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून,विक्की अवचट याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला.त्यानंतर,८ जून ते १३ जून २०२५ या कालावधीत लाखनी येथील एका खाजगी लॉजवर तसेच इतर विविध ठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केला.अश्यातच काही दिवसांनी पीडित तरुणीने जेव्हा लग्नासाठी विचारले असता,तेव्हा तरुणाने लग्नास स्पष्ट नकार दिला.आपली फसवणूक झाल्याचे आणि केवळ लैंगिक शोषणासाठी लग्नाचा वापर केल्याचे लक्षात येताच पीडितेने लाखनी पोलिस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितली.लाखनी पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विक्की अवचट विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संगीता गावडे करीत आहेत.
- Advertisement -

