- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने जून २०२४ मध्ये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना” सुरू केली.सुरुवातीला ना ई-केवायसीची झंझट,ना पडताळणीची खटखट होती.नंतर योजनेला कुणाची तरी नजर लागली अन् काही लाडक्या बहिणी नकोश्या वाटू लागल्या.सुरुवातीला तब्बल २ कोटी ६२ लाख अर्ज दाखल झाले होते.मात्र,छाननीमध्ये अनेक त्रुटी समोर आल्याने एकूण २ कोटी ४७ लाख महिला पात्र ठरल्या. त्यातच,योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले होते.मात्र,दिलेल्या मुदतीपर्यंत राज्यातील २ कोटी ४७ लाख महिलांपैकी १ कोटी ८० लाख महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याचे महिला व बाल विकास विभागाने स्पष्ट केले आहे.त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने तब्बल ६७ लाख महिला लाभापासून मुकणार आहेत.तर ज्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे,त्यांच्या खात्यात आता दीड हजार रुपये जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अश्यातच ५ लाखांहून अधिक महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नाही.यामुळे अनेक महिलांच्या खात्यात अद्याप दीड हजाराची रक्कम जमा झाली नसल्याचे चित्र आहे.निवडणूक आणि तांत्रिक कारणांमुळे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे हप्ते प्रलंबित होते.त्यापैकी नोव्हेंबरचा हप्ता १ जानेवारीपासून बहुतांश महिलांच्या खात्यात जमा झाला आहे.
- Advertisement -

