Tuesday, September 1, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा तालुक्यातील दोन दारू विक्रेत्यांना न्यायालयाचा दणका; दोघांना सहा महिन्यांचा कारावास..

कुरखेडा तालुक्यातील दोन दारू विक्रेत्यांना न्यायालयाचा दणका; दोघांना सहा महिन्यांचा कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९३ पासून दारू बंदी आहे.दारू बंदी असतांना अनेकजण अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर दारू विक्री करतांना दिसून येतात.पोलीस प्रशासनाने मनात ठाणले तर सर्वच्या सर्वच काळे धंदे बंद होतात.पण,कोण अंगाला हळद लावून घेणार.सापडला तो चोर अन्यथा शिरजोर,अशी हल्ली अवस्था झाली आहे.अश्यातच कुरखेडा शहरातील एक व कुरखेडा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वाकडी येथ एका अवैध दारू विक्री करणाऱ्या महिलेला कुरखेडा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दणका देत दोघांना ६ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावल्याने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.जितेश बाबुराव नैताम रा.कुरखेडा व रूपाली सुखदेव गायकवाड रा.वाकडी,ता.कुरखेडा, जि.गडचिरोली असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.
शहरातील आरोपी जितेश बाबुराव नैताम याच्या विरोधात कुरखेडा पोलिसांच्या वतीने महाराष्ट्र दारूबंदी कायदा ६५ (ई)अन्वये गुन्हा दाखल करीत दोषारोपपत्र न्यायालयात सक्षमपणे सादर करण्यात आले होते.या प्रकरणाचा न्याय निवाडा करतांना न्यायालयाने ३१ डिसेंबर रोजी जितेश नैताम याला दोषी ठरवत ६ महिने साधा कारावास व २५ हजार द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली,तर प्रकरणातील आरोपी रूपाली सुखदेव गायकवाड या महिलेलाही न्यायालयाने प्रकरणात दोषी ठरवत ६ महिन्यांचा साधा कारावास व २७ हजार द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.न्यायालयाच्या दणक्याने दारू विक्री करणाऱ्यांनी मोठा धसका घेतला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!