Wednesday, October 7, 2026
Homeभंडाराधक्कादायक घटना..! दुर्गा मातेच्या मंदिरात एका दिवासाचा नवजात बाळ आढळला मृतावस्थेत..

धक्कादायक घटना..! दुर्गा मातेच्या मंदिरात एका दिवासाचा नवजात बाळ आढळला मृतावस्थेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कटंगी मार्गावरील शिवतीर्थ परिसरातील दुर्गा मातेच्या मंदिरात एका दिवासाचे नवजात बाळ मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.मानवी मनाला कीव येईल अशी धक्कादायक घटना काल मंगळवारी सकाळच्या राजापूर-नाकाडोंगरी येथील मुख्य मार्गावरील श्री क्षेत्रात उघडकीस आली.मॉर्निंग वॉककरीता मंदिराच्या खुल्या परिसरात फेरफटका मारणाऱ्या स्थानिकांना सदरची बाब लक्षात येताच तात्काळ गोबरवाही पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. परिसरातील दुर्गा मातेच्या अलगद पायाजवळ कापडात गुंडाळून ठेवलेल्या त्या निष्पाप जीवाला कोण तिथे सोडून गेले? त्या अर्भकाला तिथे सोडताना तो जिवंत होता का?असल्यास इतक्या कडाक्याच्या थंडीमुळे तो दगावला असावा? कुण्या कुमारी मातेने त्याला तिथे सोडले असावे,अशी कुजबूज अनेकांच्या मनात सुरू झाली.पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मृत आढळून आलेला तो बाळ कुणाचा? याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही.घटनास्थळी दाखल पोलिस व वैद्यकीय चमूने वर्तविलेल्या प्राथमिक अंदाजानुसार घटना सोमवारच्या मध्यरात्रीची असावी.त्यातही देवीच्या पायाशी बाळाला ठेवते वेळी तो जिवंत असावा आणि कडाक्याच्या थंडीमुळे तो दगावला असावा,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.उत्तरीय तपासणी नंतरच वास्तविकता पुढे येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

आता तालुकास्तरावरच मिळणार तात्पुरते फटाका सेंटरचे परवाने..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रीचा परवाना मिळवण्यासाठी आता व्यावसायिकांना जिल्हा मुख्यालयात येण्याची गरज भासणार नाही.अर्जदारांची गैरसोय आणि वेळेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!