- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-घरकुल मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून अद्याप निधी न मिळाल्याने अनेकांचे घरकुल बांधकाम रखडले आहेत. घरकुल मंजूर होऊनही निधी वितरित न झाल्यामुळे अनेक गरजू कुटुंब आजही कच्च्या,मोडकळीस आलेल्या घरात वास्तव्यास असल्याचे चित्र आहे.या लाभार्थ्यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.काहींना घरकुलासाठी आवश्यक असलेला पहिला हप्ता न मिळाल्यामुळे बांधकाम सुरू करता येत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे,तर काहींना पहिला हप्ता मिळाला असून दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे बांधकाम रखडले आहे.विशेष म्हणजे,काही लाभार्थ्यांनी कर्ज काढून पाया खोदकाम केले असतांना निधीअभावी काम अर्धवट अवस्थेत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे अनेकांच्या स्वप्नाला तडे जात आहेत.बरीचशी घरकुल बांधकामे अर्धवट अवस्थेत असल्याने राहायचे कुठे? असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करून सोडत आहे.सरकार गरिबांसाठी घरकुल योजना राबवत असतांना प्रत्यक्षात मात्र लाभार्थ्यांना निधीअभावी वंचित राहावे लागत आहे.
- Advertisement -

