- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-देशातील त्याचबरोबर विविध राज्यातील अनेक मान्यवर,सामाजिक कार्यकर्ते व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचे नागरी सन्मान म्हणून भारतरत्न,पद्मश्री,पद्मभूषण, पद्मविभूषण यांसारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात येते.मात्र,देण्यात येणारे नागरी सन्मान ही पदवी नसल्याने नावा समोर वा नावाच्या मागे लावता येणार नाही; असे मत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या केस टायटलमध्ये ‘पद्मश्री’ असे लिहिण्यात आल्याने व्यक्त केले.न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसन यांचे खंडपीठ याचिकेची सुनावणी घेत होते.यामध्ये २००४ मध्ये पद्मश्रीने सन्मानित डॉ.शरद मोरेश्वर हार्डिकर हे देखील एक पक्षकार होते.केस टायटलमध्ये त्यांचे नाव ‘पद्मश्री डॉ.शरद मोरेश्वर हार्डिकर’असे लिहिले होते.यावर न्यायाधीशांनी आक्षेप घेतला आणि उच्च न्यायालयाने १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या संविधान पीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला.त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते की,पद्म पुरस्कार आणि भारतरत्न या पदव्या नाहीत आणि त्यांचा नावापुढे किंवा मागे वापर करू नये.असे करणे कायद्यानुसार चुकीचे असल्याचे म्हटले. न्यायमूर्ती सुंदरेशन म्हणाले की,सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद १४१ नुसार सर्वांना लागू होतो.याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.त्यांनी निर्देश दिले की पुढील कायदेशीर कार्यवाहीमध्ये सर्व पक्ष आणि न्यायालयांनी या नियमाचे पालन करावे.देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांमध्ये समाविष्ट असलेले पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये प्रदान केले जातात.यात पद्मश्री,पद्मभूषण आणि पद्मविभूषण हे पुरस्कार कला,समाजसेवा,विज्ञान,अभियांत्रिकी, व्यवसाय,उद्योग,वैद्यकीय,साहित्य,शिक्षण,खेळ आणि नागरी सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्यासाठी दिले जातात.
- Advertisement -

