Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूरभीषण कार अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू; तर चारजण गंभीर जखमी..

भीषण कार अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू; तर चारजण गंभीर जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-परतीच्या प्रवासात असलेल्या कारचा भीषण अपघात होऊन कारखाली दबून राहिल्याने १२ वर्षीय चिमुकलीसह चार महिलांचा जागीच मृत्यू झाला,तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,गुरुवार २५ डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ घडली.अक्सा शबरीन शेख वय १२ वर्षे,सलमा बेगम झांकीर हुसेन वय ४६ वर्षे,अफजल बेगम वय ५५ वर्षे, सायरा बानो वय ४५ वर्षे यांचा जागीच मृत्यु झाला तर शाहीन निशा वय ३७ वर्षे,नजत बेगम वय ४८ वर्षे, नुसरत बेगम वय ४५ वर्षे व अब्दुल्ल अरहान अशी गंभीर जखमींची नावे असून २८ वर्षीय कार चालक अब्दुल रहमान आश्चर्यकारकरित्या सुखरूप बचावला आहे.अपघातातील मृतक व जखमी हे तेलंगणा राज्यातील कागजनगर येथील रहिवासी असून ते  नागपुर येथील नातेवाईक यास्मीन बानो यांच्या भेटीकरीता तसेच इतर कामांसाठी गेले होते.
नागपूर येथील कामे आटोपून सर्वजण टीएस ०२ ईएन ५५४४ क्रमांकाच्या अर्टिका कारने त्यांच्या स्वगावी निघाले होते.अशातच परतीच्या प्रवासात असतांनाच  राजुरा तालुक्यातील सोंडो गावाजवळ येताच पहाटे दीड वाजेच्या दरम्यान कार चालकाच्या डोळ्यावर झापड (डुलकी)आल्याने त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पुलावरून थेट नाल्यातील खड्ड्यात कोसळली. अपघात इतका भीषण होता की,कोसळलेल्या कारचा आवाज सोंडो गावापर्यंत ऐकू आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ घटनेची माहिती राजुरा पोलिसांना दिली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून बचावकार्य सुरू केले.मात्र, उंचावरून कोसळलेली कार उलटी असल्याने कार मधुन जखमींना बाहेर काढणे अशक्य झाले. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लीवार व पथकाने  महामार्ग निर्माण कंपनीच्या सहकार्याने कटरच्या सहाय्याने कारचा काही भाग कापुन जखमींना बाहेर काढले.तोपर्यंत चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर चार जण गंभीर जखमी झाले.प्रकरणी राजुरा पोलिसांनी अपघाताची नोंद घेत मृतांचे शव उत्तरीय तपासणीसाठी राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तर प्राथमिक उपचारानंतर जखमींना चंद्रपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.प्रकरणी चालक अब्दुल रहमान याच्यावर कलम २८१,२२५(बी),१०६(१) बीएनएस तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पराग उल्लीवार करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!