चंद्रपूर :-आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आज,सोमवार २२ डिसेंबरला पंडित दीनदयाल चंद्रपूर कर्करोग(कॅन्सर)रुग्णालयाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते चंद्रपुरात होणार आहे.मुनगंटीवार यांनी आपल्या व्यावहारिक दृष्टिकोनाने आणि विकासाभिमुख सेवेने टाटा ट्रस्टच्या मदतीने चंद्रपूरच नाही तर विदर्भातील लोकांसाठी २८० कोटी रुपये खर्चुन १४० खाटांचे पंडित दीनदयाळ उपाध्याय चंद्रपूर कर्करोग रुग्णालय बांधले असून सदरचे केंद्र हे पूर्व विदर्भातील आदिवासी,ग्रामस्थ आणि सामान्य लोकांसाठी नवीन आशा आणि आशेचा किरण ठरणार आहे.कर्करोग रुग्णालयात सीटी सिम्युलेटर(सीटी-एस), मॅमोग्राफी, ३डी/४डी अल्ट्रासाऊंड,३डी/४डी आणि इलास्टोग्राफीसह यूएसजी,सीटी-१६ स्लाइस आणि एसपीईसीटी, २ लिनियर ॲक्सिलरेटर्स, बॅकीथेरपी, डिजीटल एक्स-रे,केमोथेरपी,सर्जिकल ऑन्कोलॉजीसह विशेष उपचार विभाग,आधुनिक प्रयोगशाळा: मायक्रोबायोलॉजी, हेमॅटोलॉजी, हिस्टोपॅथॉलॉजी इत्यादी या सर्व घटकांमुळे हे रुग्णालय पूर्व विदर्भातील सर्वात सक्षम,सुसज्ज आणि व्यापक कर्करोग काळजी केंद्र बनते आहे.राज्याचे अर्थमंत्री असतांना चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे हे फलित असून सर्वसामान्य जनतेसाठी असलेली कळकळ त्यांच्या दूरदृष्टीने लक्षात येते.
आज आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

