- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील डोंगरला येथील सामाजिक वनीकरण रोपवाटिकेतील प्रकरण बऱ्याच कालावधीपासून सुरू असून हळूहळू रंगात येऊ लागला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत डोंगरला रोपवाटिकेत एकूण ५० हजार रोपे तयार करण्यात आली होती.त्यापैकी २६ हजार २८१ रोपांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्याचा दावा करण्यात आला.विशेष म्हणजे,या रोपांसाठी ७ लाख ३० हजारांचा निधी खर्च करण्यात आला.यापूर्वी सदरचे प्रकरण वनमंत्र्यांच्या दालनात गेले.तक्रारीनंतर झालेल्या प्राथमिक चौकशीत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत रोपे लावल्याचा दावा असला,तरी प्रत्यक्ष चौकशी अहवालात मग्रारोहयो किंवा अभिसरण योजनेची नोंद नसल्याचे समोर आले आहे.या नोंदीतील विसंगतीमुळेच प्रकरण अधिक संशयास्पद ठरले आहे.त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणी परत शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले.चौकशी दरम्यान रोपांची लागवड,संगोपन व संरक्षण यांमध्ये मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. येथील संबंधित अधिकाऱ्यांनी कर्तव्यातील निष्काळजीपणामुळे रोपवाटिकेची दुरावस्था तसेच स्थायी वस्तूंचे नुकसान झाल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाल्याचे नमूद आहे.सामाजिक वनीकरणाचा उद्देश हरितक्षेत्र वाढविणे असतांना,प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरण संवर्धनाऐवजी पर्यावरणाची हानी होत असल्याचे या प्रकरणातून दिसून येत आहे.या संपूर्ण प्रकरणाचा खोलवर तपास झाल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- Advertisement -

